JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अभिनय क्षेत्रातला खून'; राजकीय भूमिका घेतल्याने मालिकेतून काढल्याचा किरण मानेंचा आरोप

'अभिनय क्षेत्रातला खून'; राजकीय भूमिका घेतल्याने मालिकेतून काढल्याचा किरण मानेंचा आरोप

किरण माने यांना राजकीय भूमिका घेणं नडलं आहे. त्यांना थेट मुलगी झाली हो ( kiran mane removed from mulgi zali ho ) मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे समोर आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जानेवारी- स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ( mulgi zali ho ) या लोकप्रिय मालिकेत अभिनेते किरण माने विलास पाटालाची भूमिका साकराताना दिसतात. अभिनेते किरण माने त्यांच्या भूमिकेमुळे जितके चर्चेत असतात तितकेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. त्यांच्या गावरान बाज त्यांच्या लेखणीत दिसतो. कधी शाहरुख खानच्या समर्थनात पोस्ट तर कधी राजकीय पोस्टमुळे किरण माने सतत चर्चेत असतात. या पोस्टमुळे त्यांच्यावर टीका देखील होते. मात्र किरण माने याला भिक घालताना दिसत नाही. आता खरं तरी त्यांना राजकीय भूमिका घेणं नडलं आहे. त्यांना थेट मुलगी झाली हो  ( kiran mane removed from mulgi zali ho ) मालिकेतून  बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे समोर आलं आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केले आहे. किरण माने यांनी तासाभरापूर्वी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा ! त्यांना कदाचित हेच सांगायचा आहे की, तुम्ही मला कितीही संपवायचा प्रयत्न केला तरी मी नव्याने जन्म घेणारचं.. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिय उमटत आहेत. किरण माने यांच्या भूमिकेचे सोशल मीडियावर समर्थन केले जात आहे. शिवाय त्यांच्या चाहत्या वर्गाने देखील त्यांच्या भूमिकेला पाठींबा दर्शवला आहे.किरण माने यांनी एक दैनिकाशी बोलताना सांगितले की, होय मला मालिकेतून काढून टाकले आहे. मला तासाभरापूर्वीच चॅनेलने ही माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

किरण माने पुढे म्हणाले की, ही झुंडशाही अशीच सुरु राहणार आहे. शिवबा-तुकोबांच्या आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडलं आहे, हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्रात अशी झुंडशाही खरं तर खपवून घेतली जाऊ नये. माझ्या उदाहरणामधून काय घडणार आहे, हे आपण पाहूयात. यात जर मला न्याय मिळाला नाही तर आता झुंडशाहीविरोधात बोलायला कुणीच धजावणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला न्याय मिळाला तर खूप लोक याविरोधात बोलायला पुढे येतील, काय करायचंय हे लोकांनी ठरवावं. माझ्या सगळ्या पोस्ट्स वाचा, त्यामध्ये कुठेही जातीवादी विखार दिसणार नाही. कुणावर विनाकारण पातळी सोडून केलेली टीका दिसणार नाही. वाचा- सानिया चौधरीला कोरोनाची लागण ; पोस्ट करत म्हणते, ‘मी व्यवस्थित पण..’ यावेळी किरण माने यांनी सांगितले की, काशाप्रकारे मालिकेतून मला काढण्यासाठी स्टार प्रवाहच्या पेजवर कॅम्पेन चालवलं गेलं. मला असं वाटत होतं की, महाराष्ट्रात असं नाही होणार. अशाप्रकारची झुंडशाही बिहार-यूपीमध्ये चालू शकते. पण माझ्याबाबतीत असं झालंय आणि मी याला बळी पडलो आहे. पण ठिक आहे मी यातून उभा राहण्याचा प्रयत्न करेन. मी खंबीर आहे. हा माझा अभिनय क्षेत्रातला झालेला खून आहे. हे मी आयुष्यभर लक्षात ठेवीन, असं देखील ते यावेळी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या