JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'पुढचा खडतर प्रवास मर्सेडिझने करावा म्हणतोय...'; अमेय वाघची B'day दिवशी स्वत:ला खास गिफ्ट

'पुढचा खडतर प्रवास मर्सेडिझने करावा म्हणतोय...'; अमेय वाघची B'day दिवशी स्वत:ला खास गिफ्ट

मराठमोळा अभिनेता अमेय वाघ (amey wagh ) याचा आज वाढदिवस आहे. अमेयने वाढदिवसानिमित्त स्वत:ला एक खास गिफ्ट दिली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्या या गिफ्टची जोरदार चर्चा रंगलेली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 नोव्हेंबर : मराठमोळा अभिनेता अमेय वाघ (amey wagh ) याचा आज वाढदिवस आहे. अमेयने वाढदिवसानिमित्त स्वत:ला एक खास गिफ्ट दिली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्या या गिफ्टची जोरदार चर्चा रंगलेली आहे. कलाकार मंडळी त्याच्या या गिफ्टचे कौतुक करत आहेत तसेच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देत आहेत. अमेयने वाढिवसाच्या मुहूर्तावर नवी कोरी मर्सिडीज् कार खरेदी केली आहे. तिच्यासोबतचा खास फोटो शेअर करत अमयने ही आनंदवार्ता चाहत्यांना दिली. त्यांना इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘पुढचा प्रवास खडतर असेल तर तो मर्सेडिजने करावा म्हणतो!’ अमेयच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. यासोबतच मराठी कलाकारांनी देखील कमेंट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

अमृता खानविलकरनं म्हटलंय , उफ..कमाल आमु.. तर श्रेया बुगडेने म्हटलं आहे की, विषय End तर सई ताम्हणकरने लिहिलंय, ‘नाद खुळा!’ स्वप्नील जोशीने कमेंट करत लिहिलं, ‘ये बात! होउदे खर्च. अजून खूप काही बाकी आहे. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.’ सोनाली कुलकर्णी हिने देखील कौतुक करत लिहिलं, ‘वाह वाह अभिनंदन मित्रा.’ शशांक केतकरने लिहिलं, ‘वेड… कमाल मित्रा. तू इन्स्पिरेशन आहेस.’ यासोबतच सिद्धार्थ जाधव, समीर विद्वांस, स्वानंदी टिकेकर, किरण गायकवाड, शिवानी सोनार यांसारख्या अनेक कलाकारांनी अमेयचं अभिनंदन केलं आहे. वाचा :  मराठमोळा अमेय वाघ दिसणार करण जोहरच्या ‘या’ सिनेमात यासाबोत काहींच्या भन्नाट कमेंट सर्वांचं लक्षवेधून घेत आहेत. एकानं म्हटलं आहे की,प्रवास कितीही खडतर असला तरी तो कसा पूर्ण करायचा हे वाघाला माहिती असतेच 🔥💯❤️ तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, वाघ … ऐकत नाहीत..अशा अनेक कमेंट लक्षवेधून घेत आहेत.अमेयने मर्सेडिज ए क्लास लिमोझिन ही घडी खरेदी केली आहे. अमेयने घेतलेल्या या गाडीची किंमत जवळपास 43 लाखांच्या घरात आहे. वाचा :  ‘झाँसी की रानी’ फेम अभिनेत्रीनं दिली Good News! थंगाबली लवकरच बनणार ‘बाबा’ चॅकलेट बॉय अभिनेता अमेय वाघ अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. अमेयने आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी सिनेमा, मालिका, रंगभूमी, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. दिल दोस्ती दुनियादारी ही अमेयची मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच मुरांबा, फास्टर फेणे, धुराळा यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. आता अमेय करण जहरच्या ‘गोविंदा मेरा नाम’ सिनेमात दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या