30 मे : संजय दत्तच्या संजू सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. संजय दत्तवरच्या आयुष्याचे अनेक पैलू यात उलगडलेत. रणबीर कपूरनं संजय दत्त अचूक साकारलाय. तर परेश रावल संजय दत्तच्या भूमिकेत तर मनीषा कोईराला नर्गिसच्या भूमिकेत आहे. सुनील दत्तच्या भूमिकेसाठी आमिर खानला विचारलं होतं. हिरानींची तीच इच्छा होती. पण आमिर खान म्हणाला, दंगलनंतर सगळेच मला मोठ्या वयाच्या भूमिका देतील. म्हणून त्यानं ही भूमिका स्वीकारली नाही. ट्रेलरमध्ये संजय दत्तच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. संजय दत्त या ट्रेलरमध्ये म्हणतोय, मी दहशतवादी नाही. पण पोलीस ते ऐकत नाहीत. उलट बाँम्बस्फोटाबद्दल तुला माहीत होतं, असं तू कोर्टात सांग असं ते सांगतात. अभिनेत्याला सर्वसाधारण कैद्यासारखंच वागवलं जातंय. त्याचे अण्डरवर्ल्डशी असलेले संबंधही दाखवलेत. संजय दत्तच्या प्रेमकथाही सिनेमात आहेत. संजय दत्तच्या आयुष्यातल्या अनेक सत्य घटना सिनेमातून समोर येणार आहेत. काॅपी राईटसाठी संजय दत्तनं एकही पैसा घेतला नाहीय. दहशतवाद, गुन्हेगारी जग आणि संजय दत्त अशा अनेक गोष्टी समोर येणार आहेत.