JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ही मनीष पॉलची लेक? पहिल्यांदाच बापलेकीला एकत्र पाहून सगळेच थक्क, पाहा VIDEO

ही मनीष पॉलची लेक? पहिल्यांदाच बापलेकीला एकत्र पाहून सगळेच थक्क, पाहा VIDEO

टीव्हीवरील प्रसिद्ध होस्ट अभिनेता मनीष पॉलनेसुद्धा आपल्या घरी गणरायाचं स्वागत केलं आहे. यादरम्यान त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2  सप्टेंबर-   देशभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. सर्व सामान्य लोकांपासून मनोरंजन सृष्टीतील कलाकारांपर्यंत सर्वजण बाप्पाच्या भक्तीत न्हाऊन निघाले आहेत. नुकतंच घराघरात गणरायाचं आगमन झालं आहे. तत्पूर्वी काही ठिकाणी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जनदेखील करण्यात आलं आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध होस्ट अभिनेता मनीष पॉलनेसुद्धा आपल्या घरी गणरायाचं स्वागत केलं आहे. यादरम्यान त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहूया या व्हिडीओमध्ये नेमकं आहे तरी काय. गणेशोत्सवादरम्यान अनेक सेलेब्रेटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये एक व्हिडीओ मनीष पॉलचादेखील आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ मनीष पॉलमुळे नव्हे तर त्याच्या लेकीमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये मनीष आपली लेक साईशा पॉलसोबत दिसून येत आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदाच सोशल मीडियावर मनीषच्या लेकीची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. चाहते हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत. मनीष पॉलची लेक इतकी मोठी झालीये आपण तिला पहिल्यांदाच पाहिल्याचं अनेकांनी म्हटलंय. या व्हिडीओवर सध्या प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव होत आहे. अनेकांनी मनीष पॉल लग्न झालंय आणि तिला इतकी मोठी लेक आहे याची आपल्याला कल्पनाच नसल्याचं म्हटलंय. तर काहींनी मनीष अजूनही इतका तरुण दिसतो की ती त्याची लेक नसून धाकटी बहीण वाटते असं म्हटलं आहे. नेटकऱ्यांना मनीष पॉलच्या लेकीचा साधेपणा प्रचंड आवडला आहे. स्टारकिड असूनसुद्धा ती इतकी शांत आणि साधेपणाने राहते म्हणत अनेकांनी तिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

संबंधित बातम्या

(हे वाचा: Mega Blockbuster: रश्मिका मंदाना-कपिल शर्माची जमणार जोडी? झाली ‘मेगा ब्लॉकबस्टर’ची घोषणा ) व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मनीष आणि साईशाने पारंपरिक लुक कॅरी केला आहे. इतकंच नव्हे तर बापलेकीने कपड्यांचं ट्विनिंग केलं आहे. व्हिडीओमध्ये मनीष पॉल कोणाशीतरी बोलताना दिसून येत आहे. तसेच आपल्या लेकीचा हात धरुन एकठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाताना दिसत आहे. मनीष पॉल सोशल मीडियावर सक्रिय असला तरी, त्याला आपल्या खाजगी गोष्टी फारश्या शेअर करायला आवडत नाही. त्यामुळे तो फारच कमीवेळा आपल्या कुटुंबासोबत कॅमेऱ्यात कैद होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या