JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / घटस्फोटानंतर अरबाज खानबद्दल मलायका अरोरा म्हणते...

घटस्फोटानंतर अरबाज खानबद्दल मलायका अरोरा म्हणते...

मलायकानं मुलगा अरहान आणि अरबाज खानसोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा केला आहे.

0107

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या रिलेशनशिपची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. अर्जुनच्या वाढदिवसाला मलायकानं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुलीही दिली. त्यानंतर एका मुलाखतीत मलायका अर्जुनबाबत मोकळेपणानं बोलली.

जाहिरात
0207

या मुलाखतीत मलायकानं मुलगा अरहानला अर्जुनसोबतच्या नात्याविषयी माहित असून तो यासाठी खुश आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मलायकानं अरहान आणि अर्जुनसोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा केला आहे.

जाहिरात
0307

नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखातीत मलायका म्हणाली, अर्जुनसोबतच्या नात्यानं आई म्हणून मी आणि अरहानच्या नात्यात काहीच बदल झाला नाही. दोन व्यक्तीमधील नातं किंवा वेगळं होण्याचा निर्णय हा त्यांच्या खासगी आयुष्याचा भाग असतो. त्यामुळे त्यावरुन त्यांच्याबद्दल कोणतंही मत मांडणं चुकीचं आहे.

जाहिरात
0407

मलायका पुढे म्हणाली, मी आणि अरबाज दोघंही आमच्या वैयक्तीक आयुष्यात खूप पुढे गेलेले आहोत. पण आम्हाला आमच्या मुलाच्या बाबतीत संवेदनशील राहायला हवं. जेव्हा मी अरबाज पासून वेगळी झाले तेव्हा मला असुरक्षित वाटत होतं. खरंतर मी कमकुवत नाही,पण मला कोणत्या दिशेला जायचं आहे हे मला माहित नव्हतं.

जाहिरात
0507

मलायका सांगते, माझा मुलगा नेहमीच माझी पहिली गरज आहे. तो मला खूप समजून घेतो आणि पाठिंबा देतो. मला याची खूप गरज होती. त्याच्यासाठी माझा आनंद आणि माझ्यासाठी त्याचा आनंद नेहमीच सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. मला घडविण्यात अरहानची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

जाहिरात
0607

या मुलाखातीत मलायकानं तिला वयावरून ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली, मी अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. मला फक्त माझे मित्र, माझा परिवार, माझा मुलगा आणि माझा जोडीदार माझ्याबद्दल काय विचार करतो याने फरक पडतो.

जाहिरात
0707

अर्जुनसोबतच्या रिलेशनशिपविषयी मलायका म्हणाली, आम्हाला नेहमीच वयातील फरकामुळे ट्रोल केलं जातं मात्र हेच जर मुलगी मुलापेक्षा लहान असेल तर लोकांना काही समस्या नसते. त्यामुळे या लोकांच्या बोलण्याचा माझ्यावर काही फरक पडत नाही. हे नातं खूप अद्भुत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या