Tuzyat Jiv Rangala, Ranada - तुझ्यात जीव रंगला मालिका आता दोन वर्षांनी पुढे जाणार. सुरुवातीला साधासुधा असलेला राणादा वेगळ्या रूपात आता परत येणार आहे.
तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणादाच्या जाण्यानं अख्खं गावच थिजून गेलंय. अंजली म्हणजेच पाठकबाईंनी सरपंचपदाचा राजीनामा दिलाय. अंजली अजून शाॅकमध्येच आहे.
तुझ्यात जीव रंगला मालिका आता दोन वर्षांनी पुढे जाणार. सुरुवातीला साधासुधा असलेला राणादा आता परत येणार आहे.
दरम्यान गावात नंदिताची दहशत आहे. गाव नंदिता आणि पप्याच्या छळाला कंटाळलाय आणि नंदिताला धडा शिकवायला राणादा येतो.
राणा हा राजा राजगोंडा बनून पुन्हा येतो. पण आता त्याचा पूर्ण मेकओव्हर झालाय. तो साऊथ इंडियन लूकमध्ये आहे.
राजा बनून आलेला राजा हा गावाला नंदिताच्या जाचापासून वाचवणार. कारण तो आता बावळट राहिलेला नाही. तो बिनधास्त आणि डॅशिंग आहे. या आठवड्यात राणाचा हा मेकओव्हर पाहायला मिळणार आहे.