JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'माझा होशील ना' फेम सईच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, क्यूटवाला VIDEO पाहाच!

'माझा होशील ना' फेम सईच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, क्यूटवाला VIDEO पाहाच!

माझा होशील फेम गौतमी देशपांडे हिने नुकताच ति एक क्यूटवाला व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिच्या घरची चिमुकल्या बेबी गर्लचे आगमन झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जानेवारी- झी मराठीवरील माझा होशील ना ( majha hoshil na ) मालिकेने निरोप घेतला आहे. मात्र या मालिकेतील सई आणि आदित्या यांच्या जोडीला प्रेक्षक अद्याप विसरू शकेलेले नाहीत. सईची भूमिका साकारणाऱ्या गौतमी देशपांडे हिस (gautami deshpande )  या मालिकेने अमाप लोकप्रियता मिळवून दिली. यानंतर ती दुसऱ्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाही मात्र ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिनं एक क्यूटवाला व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिच्या घरची चिमुकल्या बेबी गर्लचे आगमन झालं आहे. गौतमी देशपांडाने नुकताच सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत म्हणत तिनं म्हटलं आहे की, स्वागत आहे नवीन बेबी गर्लची. तिनं एका क्यूटवालं कुत्र्याचे पिल्लू घरी आणलं आहे. या नवीन पाहुण्याच्या आगमनामुळे ती चांगलीच आनंदी दिसत आहे. याच्यासोबत ती मस्ती करताना दिसत आहे. गौतमीने  सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे.

संबंधित बातम्या

गौतमी आणि मृण्यमयी या देशपांडे सिस्टरनीं नुकतीच किचन कल्लाकारमध्ये हजेरी लावली होती. या भागत त्या धमाल मस्ती करतान दिसतात. गौतमी आणि मृण्यमयी अभिनयासोबत उत्तम गातात देखील. अनेकदा सोशल मीडियावर दोघीही गायनाचे व्हिडिओ शेअर करत असतात. गौतमीस   गाण्याचा वारसा तिला तिच्या आजीकडून आला आहे.गौतमी तिच्या फोटोशुटमुळे देखील चर्चेत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या