JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होताच महेश मांजरेकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'माझे वकील..'

POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होताच महेश मांजरेकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'माझे वकील..'

‘नाय वरन-भात लोन्चा कोण नाही कोन्चा’ प्रकरणावर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची प्रतिक्रिया

जाहिरात

Mahesh Manjrekar

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 फेब्रुवारी-   अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर   (Mahesh Manjrekar)  पुन्हा एकदा त्यांच्या चित्रपटाबाबत कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. ‘नाय वरन-भात लोन्चा कोण नाही कोन्चा’  (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha)  या मराठी चित्रपटामुळे त्यांच्या अडचणी वाढत आहेत. चित्रपटात अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी महेश मांजरेकर यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा त्यांनी या प्रकरणी मौन सोडत स्पष्टपणे सांगितले की मी माझ्या चित्रपटासोबत आहे. या प्रकरणावर स्वतःमहेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले की त्यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे माझे वकील त्यानुसार उत्तर देतील. मी माझ्या चित्रपटाच्या बाजूने उभा आहे. कारण चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने मंजुरी दिली आहे. त्यामुळे याबाबतीत मी आणखी काय सांगू?’ काय आहे नेमकं प्रकरण- जेव्हा ‘नाय वरन-भात लोन्चा कोण नाही कोन्चा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. तेव्हा राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) प्रमुख रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले होते. या पत्रात, NCW प्रमुखांनी ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या लैंगिक साहित्य प्रसारावर’ बंदी घालण्याची मागणी केली होती. यामध्ये नमूद केले आहे की महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट सामग्री दर्शविली आहे. आणि त्यात अल्पवयीन मुले आणि महिलांना आक्षेपार्ह अवस्थेत दाखविण्यात आलं आहे’. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) न्यायालयाने मुंबई पोलिसांना अभिनेता-चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि मराठी गुन्हेगारी-नाटकाशी संबंधित लोकांविरुद्ध दाखल केलेल्या एका तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या