मुंबई, 2 जानेवारी - महेश भट्ट (Mahesh Bhatt) हे त्यांच्या हार्ड हिटिंग चित्रपटांसाठी ओळखले जातात. 90 च्या दशकात सडक, सर आणि क्रिमिनल या सर्वच चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला. या चित्रपटांची समीक्षकांनी देखील खूप प्रशंसा केली. वास्तावादी चित्रपट बनवल्यानंतर महेश भट्ट यांनी काहीसे वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवण्याचे निर्णय घेतला. त्यांनी डुप्लिकेट**(Duplicate)** नावाचा मसाला विनोदी चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. डुप्लिकेट सिनेमासाठी शाहरुख खान चांगलाच उत्साहात होता. या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत होता. ज्यामध्ये सोनाली बेंद्रे आणि जुही चावला देखील होत्या. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. यापूर्वी एका मुलाखतीत महेश भट्ट यांनी खुलासा केला होता की, त्यांनी त्यांची 4 वर्षांची मुलगी आलिया भट्टला प्रभावित करण्यासाठी या सिनेमाची निर्मिती केली होती. वाचा- ZID फेम अभिनेत्री Shraddha Das चं बोल्ड फोटोशूट होतंय व्हायरल, पाहा PHOTOS लेहरे क्रूला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट म्हणाले होते की, हा एक चित्रपट आहे जो मी माझ्या मुलांना दाखवण्यासाठी उत्सुक आहे. कारण, माझे यापूर्वीचे चित्रपट मुलांसाठी खूप हिंसक होते. त्यावेळी केवळ चार वर्षांची असलेल्या आलियाला प्रभावित करण्याच्या आशेने त्यांनी या सिनेमाची निर्मिती केली. मुलं सहसा त्यांच्या पालकांपासून प्रभावित होत नाहीत. त्यावेळी मी विचार केला होती की, माझ्या चार वर्षांच्या मुलीला आलियाला डुप्लिकेटने प्रभावित करू शकेन. वाचा- टायगर आणि दिशा पाटनी नववर्षाची सुट्टी संपवून मुंबईत परतले, पाहा Airport Look शाहरुख खानने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता की, अशा भूमिकेला न्याय देण्यासाठी किमान पाच ते दहा वर्षांचा अभिनयाचा अनुभव असणे गरजेचे आहे. शाहरुखने सांगितले की, ही भूमिका त्याच्याकडे एवढ्या लवकर येईल अशा नव्हती. त्यामुळे त्याने ही भूमिका लवकरात लवकर स्वीकारली.