JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अजित पवार म्हणजे धोबी का पप्पू' बॉलीवूड अभिनेत्याने उडवली खिल्ली

'अजित पवार म्हणजे धोबी का पप्पू' बॉलीवूड अभिनेत्याने उडवली खिल्ली

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकलानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकलानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. महाराष्ट्रात सुरू असलेल्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान (KRK) यानं प्रतिक्रिया दिला आहे. KRK नं ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानं आमच्याकडे बहुमत नाही असं सांगितल्यानंतर केआरकेचं ट्वीट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान अजित पवारांवर निशाणा साधताना लिहिलं, आज अजित पवार धोब्याचा पप्पू ठरले. ना घरातले राहिला ना घाटवरचे. याशिवाय त्यानं आणखी एक ट्विट केलं ज्यात त्यानं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. केआरकेची ही दोन्ही ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सुप्रीम कोर्टानं आदेश दिला होता की बुधवारी संध्याकाळी 5 वाजण्याआधी फ्लोअर टेस्ट घेण्यात यावी. यानंतर भाजपनं त्यांच्या सर्व आमदारांना रात्र 9 वाजता बैठकीसाठी बोलावलं होतं. पण त्याआधीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सुप्रीम कोर्टानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. ===============================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या