JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / संजय दत्तची पत्नी मान्यताचा बोल्ड अंदाज, शेअर केले मालदीवमधील BIKINI PHOTOS

संजय दत्तची पत्नी मान्यताचा बोल्ड अंदाज, शेअर केले मालदीवमधील BIKINI PHOTOS

मान्यता आणि संजय दत्तनं 2008 मध्ये लग्न केलं असून मान्यता ही संजय दत्तची तिसरी पत्नी आहे…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. मान्यता बॉलिवूड पासून दूर असली तरीही तिचे फोटो पाहिल्यावर लक्षात येतं की ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. दोन मुलांची आई असलेली मान्यता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मान्यता सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत असून इथले काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मान्यतानं मालदीव बीचवरील ब्लॅक बिकिनी फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती एका यॉटवर चिल करताना दिसत आहे. या फोटोला तिनं मजेशीर कॅप्शन सुद्धा दिलं आहे. ज्यात तिनं लिहिलं, ‘अशा ठिकाणी जा जिथे वायफाय स्लो असेल आणि हवा खूप जोरात वाहत असेल.’ या फोटोमध्ये मान्यताचा हॉट अंदाज पाहायला मिळत असून तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

मान्यता दत्त सध्या मालदीवमधील गार हवा आणि सुंदर समुद्र किनाऱ्यांचा आनंद घेत आहे. मान्यताच्या या फोटोवर बॉलिवूड अभिनेता अली फजलनंही कमेंट केली आहे. त्यानं कमेंटमध्ये हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. मान्यतानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे.

मालदीवच्या किनाऱ्यावरील बिकिनी फोटो शेअर करण्याआधी मान्यताना आणखी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती किनाऱ्यावर फिरताना दिसत आहे तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. मान्यता मालदीव्समध्ये पूर्ण रिलॅक्स मूडमध्ये असून सोशल मीडियावर सर्व अपडेट देताना दिसत आहे. मान्यता आणि संजय दत्तनं 2008 मध्ये लग्न केलं असून त्यांना शहरान आणि इकरा अशी दोन जुळी मुलं आहेत. मान्यता ही संजय दत्तची तिसरी पत्नी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या