‘लायगर’ स्पोर्ट्स अॅक्शन ड्रामामध्ये अनन्या पांडे विजय देवरकोंडा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकतंच या जोडीनं मुंबई लोकलनं प्रवास केलेला पहायला मिळाला. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनन्या पांडे यांचा आगामी चित्रपट 'लाइगर' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सध्या दोघेही 'लाइगर' सिनेमाच्या जोरदार प्रमोशमनमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच दोघेही मुंबईतील वांद्रे येथे लोकलनं प्रवास करताना दिसले.
अनन्या आणि विजयनं मुंबई ट्रॅफिकवर मात करण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा एक प्रमोशन स्टंट असल्याचं म्हटलं जातंय.
यापूर्वी 'जुग जुग जियो' सिनेमाच्या टीमनंही लोकलनं प्रवास केला होता. त्यांनीही सिनेमाच्या प्रमोशनसाठी स्टंट केल्याच्या चर्चा होत्या. अशातच आता 'लाइगर'च्या टीमनंही हा प्रमोशन स्टंट केल्याचं पहायला मिळालंय.
अनन्या मुंबईत राहत असूनही तिनं क्वचितच लोकलंनं प्रवास केला आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा एक चांगला अनुभव होता.
विजय देवरकोंडा तर पहिल्यांदाच मुंबईत आला आहे आणि त्याच्यासाठी मुंबई लोकलनं प्रवास करणं हा एक नवा अनुभव आहे.
'लाइगर' स्पोर्ट्स अॅक्शन ड्रामामध्ये अनन्या पांडे विजय देवरकोंडा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. फ्रेश जोडी आपल्याला 24 ऑगस्टला सिनेमागृहात पहायला मिळणार आहे. त्यामुळे दोघांचे चाहते खूप उत्साही आणि आनंदी आहेत.