कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. शनिवारी 30 ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांची गर्दी झाली आहे. काही लोक सोशल मीडियावर आपल्या आवडत्या अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अशा परिस्थितीत आता त्यांच्या बालपणीचे काही दुर्मिळ फोटो सोशल व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये ते पाहायला मिळत आहे. त्यांच्या बालपणापासून ते तरुणपणापर्यंतचा काळ त्यांनी फोटोंमध्ये अतिशय नेत्रदीपक पद्धतीने टिपला आहे. वयाच्या 46 व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या या अभिनेत्याने वयाच्या 6 व्या महिन्यांतच सिनेक्षेत्रात पाऊल ठेवलं होतं.
त्यांचे वडील दिवंगत अभिनेते डॉ राजकुमार हे होते. त्यांच्या वडीलांच इंडस्ट्रीत मोठं नाव होतं. अभिनेत्याचा मोठा भाऊ शिवा राजकुमार हा देखील अभिनेता आहे. आणि तो मोठ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. नुकताच त्याचा 'बजरंगी 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये अभिनेता पुनीतही पोहोचला होता.
पुनीतची आई पार्वतम्मा ह्या होत्या. त्या एक निर्माती आणि वितरक होत्या. त्याचे आई-वडील दोघेही चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. पुनीत स्वतः पार्श्वगायक, टीव्ही प्रेझेंटर आणि निर्माता होता. तो बहुप्रतिभावान कलाकार होता. घरातील पाच भावंडांमध्ये तो सर्वात लहान होता.
पाळण्यात असतानच पुनीतने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. म्हणजेच वयाच्या ६ व्या महिन्यांत पुनीतला 'प्रेमदा कनिके' आणि 'आरती' या चित्रपटांमध्ये घेण्यात आलं होतं.
पुनीतने 2002 मध्ये 'अप्पू' या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना इतका आवडला की त्याचे चाहते त्याला प्रेमाने अप्पू म्हणूच बोलावत होते.