JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लतादीदी@90 : या राजकुमारावर लता मंगेशकरांचं होतं प्रेम, पण...

लतादीदी@90 : या राजकुमारावर लता मंगेशकरांचं होतं प्रेम, पण...

लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 सप्टेंबर: आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायिका म्हणून एक वेगळी ओळख त्यांनी वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं सोशल मीडियावर त्यांनी गायलेली गाणी पुन्हा एकदा शेअर केली जात आहेत. 28 सप्टेंबर 1929 साली त्य़ांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदौर इथे मराठी कुटुंबात झाला. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यांनी 30 हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांच्याविषयी तुम्हाला या काही खास गोष्टी माहिती आहेत का? 27 जानेवारी 1963 रोजी लतादीदींनी गायलेलं गाण ए मेरे वतन के लोगो या गाण्याने श्रोत्यांच्याच नाही तर भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. आजही हे गाणं अजरामर आहे. जे प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांचं उभे करतं. किती हसाल या चित्रपटात पहिल्यांदा त्यांना गाण्यासाठी संधी मिळाली. त्यांनी सुरुवातील काही चित्रपटांमध्ये अभिनय आणि गायन दोन्ही केले. मधुबाला यांना लतादीदींचा आवाज खूप आवडायचा. त्याच्या सर्व चित्रपटासाठी लतादीदींसोबत त्यांनी त्यावेळी गाण्याचा करार करून घेतला होता.लतादीदींचे स्थानिक भाषेतील उच्चार स्पष्ट नसल्यानं अभिनेता दिलीप कुमार यांनी त्यावेळी त्यांच्या चित्रपटात गाण्यासाठी सहमती दिली नव्हती. त्यानंतर मात्र लतादीदींना उर्दू, हिंदी, मराठी अशा 14 प्रादेशिक भाषांमध्ये जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर 50 हजारहून अधिक गाणी गायली आणि आजही ती तितकीच लोकप्रिय आहेत.

लतादीदींनी अनेक प्रेमगीतं गायली मात्र त्यांच्या आयुष्यात प्रेम फुलवण्य़ात मात्र त्या अपयशी राहिल्या त्यांनी लग्न केलं नाही. संपूर्ण घराची जबाबदारी असल्यानं लग्न केलं नाही असंही म्हटलं जातं. मात्र लतादीदींचं एका राजकुमारावर प्रेम होतं अशीही एक चर्चा होती. डुंगरपूरचे राजकुमार राज सिंह यांच्यावर त्यांचं प्रेम होतं मात्र काही कारणांनी त्यांचं प्रेम फुलू शकलं नाही. राज सिंह हृदय़नाथ मंगेशकरांचे खूप चांगले मित्र होते. त्यांना क्रिकेटचं वेड होतं. त्यांचं हृदयनाथ मंगेशकरांच्या घरी येणं जाणं असल्यानं तिथेच त्यांची ओळख झाली आणि त्याचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. मात्र राज सिंह यांच्या वडिलांना ही गोष्ट कळताच त्यांचा या सगळ्याला विरोध होता. याबाबत लतादीदींनी मात्र कधीही कुठेही स्वत:हून काही खुलासा केला नसल्यानं त्यांच्या लग्न न करण्याचं कारण मात्र गूढच राहिलं. 1992 रोजी लतादीदींवर विष प्रयोगही करण्यात आला होता.लतादीदींचे निकटवर्तीय पद्मा सचदेव यांनी याबबत त्यांच्या ऐसा कहाँ से लाऊ या पुस्तकात सांगितलं आहे. 3 महिने त्यांच्यावर उपचार सुरु होते.मात्र त्यांच्यावर विषप्रयोग कोणी आणि का केला याच कारण मात्र अद्याप कळू शकलं नाही.

लतादीदींनी अनेक गाणी गायली मात्र त्यापैकी एक असं गाण आहे जे त्यांना स्वत:ला ते खूप आवडतं. 1977 साली किनारा चित्रपटासाठी प्रसिद्ध कवी गुलझार यांनी ‘नाम गुम जाएगा’ हे गीत लिहिलं होतं. जे लतादीदींचं आजही खूप आवडतं गाणं आहे. 1975 साली आंधी चित्रपटासाठी लिहिलेलं तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा हे गीतही लतादीदींचं आवडतं गाणं आहे. ग्रामोफोनपासून कारवा-मोबाईलपर्यंत माध्यमं बदलली मात्र लतादीदींचा आवाज आजही तितकाचं लोकांच्या मानत घर करुन आहे. लतादीदींची गाणी अगदी वृद्धांपासून लहानांच्या ओठी गुणगुणली जातात. त्यांच्या आवाजाची जादू फक्त भारतातच नाही तर जगभरातील लोकांवर आहे.लतादीदींचा भारतरत्न, जीवनगौरव यांसारख्या अनेक पुरस्कारानं त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. SPECIAL REPORT: शत्रूसोबत दोन हात करणारं भारतीय नौदल आता आणखी बळकट होणार!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या