अभिनेत्री लवकरच ‘गणपत पार्ट 1’ मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ असणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अभिनेत्री चित्रपटांप्रमाणेच सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय असते.
अभिनेत्रीने फोटो शेअर करत सर्वांचं नवीन वर्ष या स्वेटशर्टसारखं तेजस्वी असावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.
क्रिती सेनन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांच लक्ष वेधून घेते.
अभिनेत्री लवकरच 'गणपत पार्ट 1' मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ असणार आहे. या दोघांनी 'हिरोपंती' या चित्रपटातून एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
तसेच अभिनेत्री काही दिवसांपूर्वी आपल्या 'मिमी' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं मोठं कौतुक झालं होतं.