मुंबई, 1 सप्टेंबर: लोकांना पोट धरुन हसवणारा सर्वांचा आवडता आणि लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. हा कॉमेडी शो टीव्हीवर पुनरागमन करणार असून शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे सध्या या शोविषयी नवनवीन माहिती समोर येत असलेली पहायला मिळतेय. कपिल शर्माच्या नव्या सीझनसाठी कॉमेडी किंग कपिलनंही खास तयारी केली आहे. यावेळी प्रेक्षकांना सपना म्हणजेच कृष्णा अभिषेक शोमध्ये दिसणार नाही. जेव्हा कृष्णा अभिषेक द कपिल शर्मा शोचा भाग नव्हता, तेव्हा त्याच्या आणि कपिलच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अद्यापही या बातम्या सुरुच आहे. आता यावर कृष्णानं स्वतःच सत्य सांगितलं आहे. द कपिल शर्मा शोमध्ये सहभागी न होण्यावरुन मीडियानं कृष्णाला प्रश्न केला. सोबतच कपिल आणि तुझ्यामध्ये काही झालंय का? असाही प्रश्न केला. यावर कृष्णानं म्हटल की, ‘मी आणि कपिल आज रात्री ऑस्ट्रेलियाला चाललोय. माझ्या आणि कपिलविषयी काही अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्यामध्ये कोणताही वाद नाहीये. आम्हा दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे आणि तो शो माझाही आहे. मी लवकरच शोमध्ये पुन्हा येईल’.
द कपिल शर्मा शोने सपनाच्या व्यक्तिरेखेने कृष्णा अभिषेकला एक खास ओळख दिली आहे. त्याच्या व्यक्तिरेखेला चांगलीच पसंती मिळाली आहे. पण तरीही कृष्णा शोचा भाग नसल्यामुळे त्याचे चाहते नाराज आहेत. हेही वाचा - Priyanka Chopra: ‘मी गेल्या 10 वर्षांपासून हॉलिवूडमध्ये….’; प्रियांका चोप्रानं शेअर केला ‘तो’ अनुभव द कपिल शर्मा शोची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. 10 सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांचा सर्वात आवडता कार्यक्रम प्रसारित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच शिगेला लागली आहे.