JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Bigg Boss14मध्ये सोनाली फोगाट यांची एण्ट्री; असा आहे या 'हरयाणवी छोरी'चा प्रवास

Bigg Boss14मध्ये सोनाली फोगाट यांची एण्ट्री; असा आहे या 'हरयाणवी छोरी'चा प्रवास

सोनाली (Sonali Phogat) यांचा घरात प्रवेश झाल्यानंतर बिग बॉसने(Bigg Boss14) त्यांचा सर्वांना परिचय करून दिला. यावेळी बिग बॉसने हरियाणाच्या दबंग लीडर आणि कलाकार सोनाली फोगाट(Sonali Phogat) यांचं घरात स्वागत(Welcome) केलं. यावेळी सर्व स्पर्धकांनी त्यांचे हसतहसत घरात स्वागत केले.

0105

बिग बॉसमध्ये(Bigg Boss14) हरियाणामधील एका महिला भाजप नेत्याची एंट्री झाली आहे. त्यांच्या या एन्ट्रीने घरातील खेळ आणखी मजेदार होणार असून वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून त्यांची एंट्री झाली आहे. या फोटोत ड्रेसमध्ये त्या खूलूनच दिसत आहेत. गॉगलमुळं त्यांचा हॉट लूक खुलून दिसत आहे.

जाहिरात
0205

सोनाली फोगाट(Sonali Phogat) यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. त्यानंतर राजकारणात(Politics) प्रवेश करून त्यांनी आपल्या राजकीय कलेचा देखील परिचय दिला आहे. हरियाणा भाजपमधील त्या दमदार नेत्या समजल्या जातात. लाल साडीमध्ये त्यांचं सौंदर्य अतिशय खुलत दिसत आहे.

जाहिरात
0305

हरियाणामधून बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाऱ्या सोनाली फोगाट या दुसऱ्या महिला आहेत. त्यांच्याआधी बिग बॉस 11 मध्ये हरियाणाची डान्सर सपना चौधरी हिने सहभाग घेतला होता. त्या सिझनमधे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. या सिझनमध्ये सपना चौधरी (Sapna Chaudhary) आणि अर्शी खान(Arshi Khan) हिच्यामध्ये मोठी भांडंणं पाहायला मिळाली होती.

जाहिरात
0405

सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांनी घरात प्रवेश करताच सर्वांना हरयाणवी भाषेत राम राम केलं. त्याच्या घरातील एंट्री आधी दंगल चित्रपटातील ‘धाकड है’ हे गाणं लावण्यात आलं होतं. त्यामुळे घरात कुणीतरी एंट्री करणार याची घरातील सदस्यांना कुणकुण लागली होती. त्यांनी घरात प्रवेश करताच सर्वांना नमस्कार करत सर्वांची ओळख करून घेतली.

जाहिरात
0505

सोनाली (Sonali Phogat) यांचा घरात प्रवेश झाल्यानंतर बिग बॉसने त्यांचा सर्वांना परिचय करून दिला. यावेळी बिग बॉसने हरयाणाच्या दबंग लीडर आणि कलाकार सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचे घरात स्वागत केले. यावेळी सर्व स्पर्धकांनी त्यांचे हसतहसत घरात स्वागत केले. या फोटोत सोनाली फोगाट आपल्या भारतीय अवतारात दिसून येत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या