JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'किचन कल्लाकार'मध्ये दिसणार प्रसिद्ध युट्यूबर Madhura Bachal, निभावणार महत्त्वाची भूमिका

'किचन कल्लाकार'मध्ये दिसणार प्रसिद्ध युट्यूबर Madhura Bachal, निभावणार महत्त्वाची भूमिका

किचन कल्लाकार या शोमध्ये सुरूवातीपासून राजशेफ म्हणून जयंती कठाळे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आता या शोमध्ये नवीन राजशेफची एंट्री होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जानेवारी- झी मराठीवर (Zee Marathi ) 15 डिसेंबरपासून किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) हा शो सुरू झाला आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक मोठमोठ्या कलाकारांनी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी देखील हजेरी लावली आहे. किचन कल्लाकार या शोमध्ये सुरूवातीपासून राजशेफ म्हणून जयंती कठाळे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आता या शोमध्ये नवीन राजशेफची एंट्री होणार आहे. प्रसिद्ध मराठी युट्यूबर रेसिपी किंग मधुरा बाचल (Madhura Bachal) झळकणार आहे. मधुरा रेसिपीच्या इन्स्टावर याचे काही फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये आमदार रोहित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे या देखील दिसत आहेत. त्यांच्यासोबत मधुरा रेसिपीच्या होस्ट मधुरा बाचल दिसत आहेत. त्यामुळे राजशेफच्या भूमिकेत आता मधुरा बाचल दिसणार असल्याचे नक्की झालं आहे. वाचा- ‘‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकी कोण माहीत आहे का? मधुरा रेसिपीच्या इन्स्टावर याचे काही फोटो शेअर करत म्हटले आहे की, नवीन वर्षाच्या सर्वांना खमंग, खुसखुशीत नी गोडच गोड शुभेच्छा. नवीन वर्षात काहीतरी नवीन! सर्व पक्षांनी एकत्र येऊन नि:पक्षपणे काय काय बनवले आणि धमाल केली बघायला विसरू नका किचन कल्लाकारमध्ये. दर बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 9.30 वाजता आपल्या लाडक्या वाहिनीवर झी मराठीवर. वाचा- Video : स्टार प्रवाहवर रिमेकची चलती ; नवीन वर्षात भेटीला येणार लग्नाची बेडी मधुरा बाचलविषयी थोडसं… मधुरा मुळची पुण्याची आहे. पण मधुरा रेसिपीमुळे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले आहे. मधुराचं लग्न मंकेश बाचलशी झालं. त्या नंतर ती काही काळ अमेरिकेत राहिली. त्यावेळी तिंन यूट्यूब चॅनेल सुरू केलं.

संबंधित बातम्या

पहिल्यांदा तिला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र तिनं 2016 ला मराछी भाषेत युट्यूब चॅनेल सुरू केलं. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 2018 मध्ये मधुराचे दहा लाख सबस्क्राईब झाले. आज या चॅनेलते मिलीयन फॉलोअर्स आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या