JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘माझ्यासोबत झोप मी तुला काम देतो’; अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

‘माझ्यासोबत झोप मी तुला काम देतो’; अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

किश्वरला का मिळालं नाही चित्रपटात काम; टीव्ही अभिनेत्रीनं केली बॉलिवूडची पोलखोल

0110

कसौटी जिंदगी की या मालिकेतून घराघरात पोहोचलेली किश्वर मर्चंड छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Kishwer Merchant/Instagram)

जाहिरात
0210

किश्वर आपल्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते. गेली दोन दशकं ती सातत्यानं विविध मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (Kishwer Merchant/Instagram)

जाहिरात
0310

तिनं आजवर रोमँटिक हिरोईन, खलनायिका इथपासून अगदी वयोवृद्ध आई इथपर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. (Kishwer Merchant/Instagram)

जाहिरात
0410

तरी देखील किश्वरला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. खरं तर तिनं अनेक चित्रपटांसाठी ऑडिशन्स दिल्या पण तिला चित्रपटात काम मिळालं नाही. (Kishwer Merchant/Instagram)

जाहिरात
0510

तिनं अलिकडेच हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं त्यावेळी बॉलिवूडमध्ये काम न करण्याचं कारण तिनं सांगितलं. (Kishwer Merchant/Instagram)

जाहिरात
0610

तिनं अनेक ठिकाणी ऑडिशन्स दिले. अनुभव आणि अभिनयाच्या जोरावर तिची निवड देखील केली जात होती. मात्र तिच्या समोर एक अजब अट ठेवली जायची. (Kishwer Merchant/Instagram)

जाहिरात
0710

जर तिनं निर्माते, दिग्दर्शक किंवा चित्रपटांमधील अभिनेत्यांसोबत शरीरसंबंध ठेवले किंवा त्यांच्या सोबत वन नाईट स्टँड केलं तर तिला ही भूमिका मिळू शकते. (Kishwer Merchant/Instagram)

जाहिरात
0810

बॉलिवूडमध्ये आज जे सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जातात त्यांनी देखील तिच्यासोबत असाच काहीसा प्रकार केला. अर्थात तिला ते मान्य नव्हतं. (Kishwer Merchant/Instagram)

जाहिरात
0910

जेव्हा कधी तिला अशा ऑफर मिळायाच्या ती थेट नाही म्हणून तिथून निघून जायची. अखेर या कास्टिंग काऊचच्या प्रकाराला वैतागून तिनं बॉलिवूडचा नादच सोडून दिला. (Kishwer Merchant/Instagram)

जाहिरात
1010

तिनं पूर्णपणे आपलं लक्ष केवळ मालिकांवर केंद्रित केलं. तिला प्रसिद्धी आणि पैसे मिळवायचे होते. या गोष्टी तिला मालिकांनी मिळवून दिल्या अन् त्यामध्ये ती आता खूष आहे. (Kishwer Merchant/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या