JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bus Bai Bus: 'क्या हुआ तेरा वादा' गाणं वाजताच किशोरी पेडणेकरांना आठवला मुख्यमंत्र्यांचा चेहरा; काय म्हणाल्या पाहा, VIDEO

Bus Bai Bus: 'क्या हुआ तेरा वादा' गाणं वाजताच किशोरी पेडणेकरांना आठवला मुख्यमंत्र्यांचा चेहरा; काय म्हणाल्या पाहा, VIDEO

‘बस बाई बस’ हा मराठी रिऍलिटी शो झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फक्त महिला सेलिब्रेटी सहभागी झालेल्या पाहायला मिळतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 ऑगस्ट-  ‘बस बाई बस’ हा मराठी रिऍलिटी शो झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फक्त महिला सेलिब्रेटी सहभागी झालेल्या पाहायला मिळतात. राजकारण ते मनोरंजनसृष्टी अशा प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिला याठिकाणी पाहुण्या कलाकार म्हणून सहभागी होतात. दरम्यान आता या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर दिसून येत आहे. या आगामी एपिसोडमध्ये किशोरी पेडणेकर यांनी आपल्या रोखठोक स्वभावाने शोमध्ये रंगत आणली आहे. नुकतंच ‘बस बाई बस’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोवरुन एपिसोड किती धमाकेदार असणार याचा अंदाज लावला जात आहे. कारण या एपिसोडमध्ये आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थिती लावली आहे. त्यामुळे सेटवर राजकीय वातावरण दिसून येत आहे. या शोमध्ये अभिनेता सुबोध भावे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे. तो त्यांना राजकारणाशी संबंधित विविध प्रश्न विचारताना दिसून येत आहे. किशोरी पेडणेकर यांनीसुद्धा अगदी स्पष्टपणे या मजेशीर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. समोर आलेल्या या नव्या प्रोमोमध्ये सुबोध भावे किशोरी पेडणेकर यांच्यासोबत काही मजेशीर गेम्स खेळताना दिसून येत आहे. दरम्यान एका टास्कमध्ये सुबोधने काही गाण्यांच्या ओळी त्यांना ऐकवल्या आणि ते गाणं ऐकून कोणत्या नेत्याचा चेहरा तुमच्यासमोर येतो याबाबत विचारलं. सर्वप्रथम त्यांना ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या गाण्याच्या ओळी ऐकवण्यात आल्या. आणि कोणाचा चेहरा समोर येतो विचारलं. यावर त्यांनी उत्तर देत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं नाव घेतलं. त्यांनतर ‘कहाँ गये वो दिन’ हे गाणं वाजवण्यात आलं यावर उत्तर देत किशोरी पेडणेकरांनी आपल्या पक्षातील मनोहर जोशींचं नाव घेतलं. नंतर ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणं वाजवण्यात आलं आणि विशेष म्हणजे यावर किशोरी पेडणेकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं.

संबंधित बातम्या

**(हे वाचा:** Bus Bai Bus: खड्डेमुक्त मुंबई शक्य आहे का?; पाहा काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ) ‘दिस येतील दिस जातील’ या गाण्यावर त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं. तर ‘क्या हुआ तेरा वादा’ या गाण्यावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं आहे. हा एपिसोड फारच रंजक बनणार आहे, यात काही शंकाच नाही. सध्या हा प्रोमो मात्र चांगलाच चर्चेत आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना एपिसोड पाहण्याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या