ग्रँड फिनाले
मुंबई, 25 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोमधील एक शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी’ होय. गेल्या अनेक दिवसांपासून या शोचा बारावा सीजन चर्चेत आहे. हा शो सध्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. कालपासून या शोचा ग्रँड फिनाले सुरु झाला आहे. या महाअंतिम सोहळ्यात टॉप 5 मध्ये आपलं स्थान पटकावण्यात टीव्ही सेलिब्रेटी रुबिना दिलैक, जन्नत जुबैर,तुषार कालिया,फैजल शेख आणि मोहित मलिक यांना यश मिळालं आहे. दरम्यान आता काही मीडिया रिपोर्ट्सने या शोच्या विजेत्यांचं नाव आणि फोटो लीक झाल्याचा दावा केला आहे. ‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय रिऍलिटी शोचा ग्रँड फिनाले सुरु आहे. धमाकेदार स्टंटवर आधारित असणाऱ्या या शोमध्ये शेवटच्या या टप्प्यावर सहा सेलिब्रेटी स्पर्धक टॉप 5 मध्ये जाण्यासाठी धडपड करत होते. त्यामधील पाच स्पर्धकांच्या यादीत रुबिना दिलैक, जन्नत जुबैर,तुषार कालिया,फैजल शेख आणि मोहित मलिक यांचा समावेश झाला तर सहावी स्पर्धक कनिका मान यातून बाहेर पडली. तिला टॉप पाचमध्ये आपलं स्थान बनवण्यात अपयश आलं, त्यामुळे ती या स्पर्धेतून बाहेर पडली. टीव्हीवर ग्रँड फिनाले एपिसोड प्रसारित होण्या आधीच सध्या सोशल मीडियावर विजेत्यांचं नाव आणि फोटो समोर आल्याची चर्चा सुरु आहे. काही सोशल मीडिया पेजच्या विजेत्याचं नाव आणि फोटो पोस्ट केला आहे. ‘खतरों के खिलाडी’ बाराचा विजेता कोण होणार? कोणाच्या हाती ही ट्रॉफी लागणार सर्वांनाच उत्सुकता लागून आहे, दरम्यान काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे की, कोरियोग्राफर तुषार कालिया या शोचा विजेता ठरला आहे. त्याचा फोटोसुद्धा व्हायरल होत आहे.
या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, ‘खतरों के खिलाडी 12’ मध्ये शेवटचे 2 स्पर्धक अर्थातच टॉप 2 मध्ये सोशल मीडिया स्टार फैजल शेख आणि कोरियोग्राफर तुषार कालिया यांचा समावेश आहे. या दोघांमध्ये ट्रॉफीसाठी संघर्ष पाहायला मिळणार आहे. तर याआधीच शूट करण्यात आलेल्या फिनाले एपिसोडमध्ये तुषार कालियाने स्टंट जिंकत ट्रॉफी पटकावली आहे.
**(हे वाचा:** Heart Of Stone: आलिया भट्टच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचा फर्स्ट लुक आला समोर; हाय व्होल्टेज अॅक्शनचा धमाका ) सेटवरील एक फोटो सध्या चर्चेत आला आहे. परंतु याबाबत अद्याप अधिकृत माहित समोर आलेली नाहीय. या शोमध्ये विजेता होणाऱ्या स्पर्धकाला लाखो रुपयांच्या मानधनासोबत एक नवी कोरी आलिशान कारदेखील मिळणार आहे.