JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मी तुला माझ्या शोमध्ये...'; तापसी पन्नू कॉफी विथ करणमध्ये सहभागी न झाल्याबद्दल करणचा मोठा खुलासा

'मी तुला माझ्या शोमध्ये...'; तापसी पन्नू कॉफी विथ करणमध्ये सहभागी न झाल्याबद्दल करणचा मोठा खुलासा

‘कॉफी विथ करण’च्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. अशातच कॉफी विथ करणचा सातवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सातव्या सीझनलाही प्रेक्षकांचा उत्साह तसाच कायम असल्याचं दिसतंय.

जाहिरात

karan johar and tapsee pannu

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई, 29 सप्टेंबर : ‘**कॉफी विथ करण’च्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. अशातच कॉफी विथ करणचा सातवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सातव्या सीझनलाही प्रेक्षकांचा उत्साह तसाच कायम असल्याचं दिसतंय. आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली असून अनेक गुपितं उघड केली आहे. मात्र या कार्यक्रमात अभिनेत्री तापसी पन्नू हजेरी लावणार नसल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. याविषयी आता स्वतः करण जोहरनंच मोठा खुलासा केला आहे. कॉफी विथ करणच्या 13 व्या भागाचा अवॉर्ड शो होणार आहे. यामध्ये आलेल्या कलाकारांना अवॉर्ड दिले जाणार आहे. यासाठी स्पेशल गेस्ट तन्मय भट, कुशा कपिला, दानिश सैत आणि निहारिका एनएम आहेत. करण आणि या चार गेस्टमध्ये प्रश्न-उत्तरांचं जबरदस्त सेशन पार पडलं. यावेळी करणने तापसी पन्नू कॉफी विथ करण’मध्ये सहभागी का झाली नाही यांचं उत्तर दिलं.

संबंधित बातम्या

करण जोहरला ज्युरीने विचारलं की, तापसी पन्नू त्याच्या शोच्या सातव्या सीझनचा भाग का बनली नाही? याला उत्तर देताना करण म्हणाला, ‘हा फक्त 12 भागांचा सीझन आहे. तापसीला एवढंच सांगू इच्छितो की जेव्हा मी तुला माझ्या शोमध्ये येण्याची विनंती करतो जेणेकरून आम्ही एका रोमांचक कॉन्टेंट तयार करु शकेल. तिने या शोमध्ये भाग होण्यास नकार दिला. त्यामुळे मला खूप वाईट वाटलं’.

दरम्यान, तापसीला कॉफी विथ करणमध्ये सहभागी न होण्याविषयी विचारण्यात आलं होतं तेव्हा तापसीनं उत्तर दिलं होतं की, “माझं सेक्स लाईफ एवढं इंटरेस्टिंग नाहीये की त्यामुळे तिला कार्यक्रमात बोलवण्यात यावं.” तिचं हे वक्तव्य चांगलंच चर्चेचा विषय ठरलं होतं. आता पुन्हा एकदा करणच्या उत्तरानं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या