मुंबई, 6 जानेवारी- छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोपैकी ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) हा एक आहे. हा शो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. विशेषकरून शोचा होस्ट कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि यातील इतर कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता सध्या हा शो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या शोमधील एका कलाकाराने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक तंगीमुळे कॉमेडियन तीर्थानंद राव **(tirthanand rao attempt suicide )**याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार तीर्थानंद राव याने 27 डिसेंबरला विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेजाऱ्यांना याची माहिती मिळाली व त्यांने त्याला रूग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलखतीमध्ये तीर्थानंद यांने या सर्व प्रकाराबद्दल सांगितलं आहे. तो म्हणाला की, आर्थिक तंगी तसेच माझ्या कुटुंबाने देखील माझी साथ सोडली होती. मी जेव्हा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रूग्णालयात घरची मंडळी माझी साधी विचारपूस करण्यास आली नसल्याचे देखील त्याने सांगितलं. माझ्यावर सध्या कर्ज आहे. मी घरात एकटा राहतो. माझ्या पत्नीने देखील दुसरं लग्न केले आहे. माझ्या घरच्यांनी उपचारासाठी एकही पैसै दिला नसल्याचे देखील त्याने सांगितलं आहे. वाचा-
शाहरुख खान ते करिना कपूर यांनी ‘या’ चित्रपटांसाठी घेतलं नाही कोणतंच मानधन! LIST
नुकतीच कपिलच्या शोमध्ये आरआरच्या टीमनं हजेरी लावली होती. आरआरआरची टी धमाल करताना दिसली. सिनेमाच्या प्रमोशनासाठी सर्व टीम आली होती. सध्या सिनेमाच्या निर्मात्यांनी कोरोनाचा विचार करता सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.