JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Kangana Ranaut : कार्यालय पुन्हा उभं राहिल, मात्र शिवसेनेची 'औकात' समोर आली; बबिताची जहरी टीका

Kangana Ranaut : कार्यालय पुन्हा उभं राहिल, मात्र शिवसेनेची 'औकात' समोर आली; बबिताची जहरी टीका

कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर मुंबई पालिकेवर विविध ठिकाणांहून टीका केली जात आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे

0106

अभिनेत्री कंगना रणौतच्या वक्तव्यानंतर मुंबई पालिकेने तिच्या पाली हिल येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. या घटनेचा अनेकांकडून तीव्र निषेध केला जात आहे. यामध्ये सर्वसामान्यांबरोबरच अनेक सेलिब्रेटिंचाही समावेश आहे. आता प्रसिद्ध खेळाडू दबंग गर्ल बबिता फोगाट कंगनाच्या समर्थनार्थ उतरली आहे.

जाहिरात
0206

बबिताने अत्यंत तीव्र शब्दात शिवसेनेवर टीका केली आहे, आपल्या वक्तव्यात तिने शिवसेनेची औकात काढली आहे.

जाहिरात
0306

मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिली घोषणा अयोध्याची झाली होती. हे केवळ कार्यालय नाही तर माझ्यासाठी राममंदिर आहे. आज तेथे बाबर आला आहे. आज इतिहास पुन्हा घडला आहे..मात्र राम मंदिर पुन्हा तुटलं तरी लक्षात ठेव बाबर मंदिर पुन्हा उभं राहिल..येथे मंदिर पुन्हा उभं राहिल...जय श्री राम, असं ट्विट कंगनाने पालिकेने कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर केलं आहे.

जाहिरात
0406

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बबिताने पालिकेच्या कारवाईनंतर शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. कार्यालय तर पुन्हा उभं राहिलं, मात्र यात शिवसेनेची औकात जगासमोर आली आहे, कंगना तुम्ही घाबरू नका..अख्खा देश तुमच्यासोबत आहे, असं ट्विट बबिताने केलं आहे.

जाहिरात
0506

दरम्यान, कंगनाच्या ऑफिसच्या तोडफोडीचे काम आता तुर्तास थांबवण्यात आले आहे. कंगनाच्या वकिलांनी घटनास्थळी पोहोचून पालिकेच्या अधिकाऱ्याला कायदेशीर कागदपत्र दाखवले आहे. तसंच, बांधकाम हे अधिकृत असल्याचा दावाही केला आहे. खुद्द कंगनाने ही ट्वीट करून बांधकाम अधिकृत असल्याचा दावा केला आहे.

जाहिरात
0606
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या