कंगनाच्या अलिशान ऑफिसचे काही अनसीन फोटो आता समोर आहे ज्यात या ऑफिसचा राजेशाही थाट पाहायला मिळत आहे.
बॉलिवूड क्वीन कंगना रणौतनं काही महिन्यांपूर्वीच स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस ऑफिस खरेदी केलं. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. (फोटो- टीम कंगना ट्विटर)
कंगनानं तिच्या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात आपल्याच कुटुंबासोबत केली आहे. तिनं प्रॉडक्शन हाऊसचं नाव 'मणिकर्णिका फिल्म' असं ठेवलं आहे. (फोटो- टीम कंगना ट्विटर)
कंगनानं जानेवारीत तिच्या ऑफिसची पुजा केली होती ज्याचे फोटो तिच्या बहिणीनं सोशल मीडियावर शेअर करत ही गुड न्यूज दिली होती.(फोटो- टीम कंगना ट्विटर)
कंगनाच्या या प्रॉडक्शन हाऊसचं ऑफिस मुंबईच्या पॉश भागात म्हणजे पाली हिल मधील 3 मजली इमारतीत आहे. (फोटो- टीम कंगना ट्विटर)
कंगनानं हे ऑफिस 48 कोटींमध्ये खरेदी केलं होतं. तिच्या या अलिशान ऑफिसचे काही अनसीन फोटो आता समोर आहे ज्यात या ऑफिसचा राजेशाही थाट पाहायला मिळत आहे. (फोटो- टीम कंगना ट्विटर)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये कंगनाचं हे ऑफिस एखाद्या ड्रीम वर्किंग प्लेस सारखं दिसत आहे. (फोटो- टीम कंगना ट्विटर)
पाली हिलच्या बंगला नंबर 5 मध्ये सुरू करण्यात आलेल्या कंगनाच्या या ऑफिसचं डिझाइन डिझायनर शबनम गुप्ता यांनी केलं आहे. (फोटो- टीम कंगना ट्विटर)
तब्बल 48 कोटी किंमतीचं हे ऑफिस फक्त प्लास्टिक फ्री नाही तर इको फ्रेंडली सुद्धा आहे. (फोटो- टीम कंगना ट्विटर)
कंगनानं एका मासिकासाठी तिच्या ऑफिसचं इनसाइड फोटोशूट करुन घेतलं आहे. ज्याच्या फोटो तिच्या टीमच्या ट्वीटरवर शेअर करण्यात आले आहेत. (फोटो- टीम कंगना ट्विटर)
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार ऑफिसच्या प्रत्येक रुमच्या डिझाइनमध्ये कंगनानं स्वतः लक्ष घातलं आहे. (फोटो- टीम कंगना ट्विटर)
सिंपल कॅफेटेरिया पासून ते स्टायलिश वर्कप्लेसपर्यंत तिचं हे ऑफिस खरंच राजेशाही वाटतं. (फोटो- टीम कंगना ट्विटर)
कंगनानं 'मणिकर्णिका' सिनेमापासून दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. आता याच सिनेमाच्या नावावर तिनं तिचं प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात केली आहे. (फोटो- टीम कंगना ट्विटर)