मुंबई, 18 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर नेपोटिजम, बॉलिवूड माफिया आणि इनसाइडर-आउटसाइडर याबाबत चर्चेला जोर आला आहे. जेथे काही कलाकार या मुद्द्यांचं समर्थन करीत आहेत, तर काहींनी याला चुकीचं ठरवलं आहे. काही दिवसांपूर्वी इंडिया टुडेसोबत बातचीतमध्ये अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूड माफिया यावर आपले विचार शेअर केले. ते म्हणाले की, बॉलिवूडमझ्ये मुव्हीमाफियासारखं काही नाही. हे सर्व काही ठराविक लोकांनी रचलेली काल्पनिक गोष्टी आहे.
शाह यांच्या या वक्तव्यानंतर कंगना रणौतनेही प्रत्युत्तर दिलं आहे. तिने ट्विट केलं आहे की इतके महान कलाकारांच्या शिव्याही प्रसादाप्रमाणे आहे. ती पुढे लिहिते, नसीरजी एक महान कलाकार आहेत. इतक्या महान कलाकाराच्या शिव्याही देवाच्या प्रसादाप्रमाणे आहे. यापेक्षा चांगलं तर मी त्यांच्यासोबत चित्रपट आणि गेल्या वर्षी आमच्यामध्ये क्राफ्टसंदर्भात झालेल्या संभाषणाकडे लक्ष देईल. यावेळी तुम्ही म्हणाला होता की तुम्हाला माझं काम आवडतं. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर कंगना रणौतने करन जोहर याच्यासह महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे. सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी यासाठी तिने सोशळ मीडियावरुन चळवळ उभी केली आहे. आता चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार नसीरुद्दीन शाह यांनाही कंगणाने प्रत्युत्तर दिलं आहे.