मुंबई, 12 एप्रिल : बॉलिवूड क्वीन कंगना रणौत चांगल्या अभिनयासोबतच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. मात्र मागच्या काही दिवसांपासून कंगना संपूर्ण सिनेसृष्टीवर नाराज आहे. 2019च्या सुरुवातीला कंगनाचा मणिकर्णिका रिलीज झाला पम या सिनेमाला इतर बॉलिवूड कलाकारांकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही. कोणीही मणिकर्णिकाला प्रमोट केलं नाही असं कंगनाचं म्हणणं आहे. पण कंगनाला सर्वात जास्त राग आला तो अभिनेत्री आलिया भटचा. त्यामुळेच मागच्या अनेक दिवसांपासूंंन कंगना जिथे संधी मिळेल त्याठिकाणी आलियावर निशाना साधत आहे. नुकत्याच जालेल्या एका मुलाखतीतही असंच काहीसं झालं. या मुलाखतीत आलियाचं नाव घेतल्यावर कंगना भडकली. एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगनानं ‘गली बॉय’मधील आलियाच्या अभिनयावर प्रतिक्रिया दिली. एका एंटरटेनमेंट एक सर्व्हे केला होता. ज्यात त्यांनी कंगना रनौत आणि आलिया भट यांच्यातून प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री निवडण्यास सांगितलं होतं. या सर्व्हेमध्ये कंगनाला प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली आणि पहिल्या क्रमांकावर राहिली. तर आलिया दुसऱ्या क्रमांकावर. पण ही गोष्ट कंगनाला समजल्यावर मात्र ती चांगलीच नाराज झालेली दिसली आणि तिनं पुन्हा एकदा थेट आलियाला टार्गेट केलं. आलियावर आपली नाराजी व्यक्त करताना कंगना म्हणाली, मला या गोष्टीची लाज वाटते की आलियाशी माझी तुलना केली जात आहे. गली बॉयमधील फटकळ मुलीचा तिनं केलेला अभिनय मला हैराण करणारा होता. महिला सशक्तिकरण आणि चांगल्या मोहिमांबद्दल बॉलिवूडचा असा विचार आहे? यावेळी कंगनानं विनंती केली की, मला या सर्व गोष्टींपासून कृपया दूर ठेवा. मीडियाकडून या स्टार किड्सना नेहमीच खूप प्रेम मिळत आलेलं आहे. कृपया आता तरी त्यांच्या बाजूनं बोलणं आणि त्यांचे लाड करणं सोडून द्या. अन्यथा चांगलं अभिनय कौशल्य कधीच बाहेर येणार नाही. कंगनाचा मेंटल है क्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता याचा बायोपिक ‘जया’मध्येही दिसणार आहे. या सिनेमासाठी कंगनानं मानधन म्हणून मोठी रक्कम घेतल्याचंही बोललं जात आहे. तर आलियाचा कलंक येता 17 एप्रिलला रिलीज होत आहे. तसेच ती अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.