JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कल्कीने असा दिला Sappho ला जन्म, पहिल्यांदाच समोर आला वॉटर बर्थचा फोटो

कल्कीने असा दिला Sappho ला जन्म, पहिल्यांदाच समोर आला वॉटर बर्थचा फोटो

अभिनेत्री कल्की केकलाने तिच्या वॉटरबर्थ प्रेग्नन्सीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 फेब्रुवारी :  अभिनेत्री कल्की केकलानं काही दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला. कल्की आणि तिचा बॉयफ्रेंड गाय यांनी त्यांच्या मुलीचं नाव Sappho असं ठेवलं  आहे. मात्र कल्कीनं तिच्या प्रेग्नन्सीच्या वेळी एक धक्कादायक निर्णय घेतला होता. कल्कीनं आपल्या मुलीला वॉटरबर्थ तंत्रज्ञानाच्या मदतीने जन्म दिला. कल्कीनं आता तिचा वॉटरबर्थ प्रेग्नन्सीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कल्कीनं हा फोटो शेअर करत प्रेग्नन्सीवेळी तिचा सांभाळ करणाऱ्या दाईचेही आभार मानले आहेत. याच पोस्टमध्ये पुढे कल्की असं म्हणते की, ‘तुम्ही कितीही वाचा, तयारी करा, डॉक्टरांकडून सल्ले घ्या, मुलांना जन्म देण्यावेळी होणाऱ्या वेदना स्वत: अनुभवल्याशिवाय कळत नाहीत. आपला सांभाळ करणारी दाईचं आपण प्रेग्नंसीवेळी नेमकं काय केलं पाहिजे, कोणता व्यायाम करायला हवा याची माहिती देते. इतकचं नाही तर आपल्या आणि आपल्या बाळासाठी काय चांगलं हेही दाई ठरवते.’

पुढे कल्कीने असंही सांगितलं की, ‘या फोटोमध्ये मी माझ्या दाईबरोबर अशा अवस्थेत आहे. ज्यात आपण आपल्या बाळाला जन्म देण्याच्या पूर्ण तयारीत असतो. ती वेळ माझ्यासाठी आतापर्यंतची सर्वात कठीण वेळ होती. मात्र दाईच्या मजबूत हातांमुळे मला Sappho ला जन्म देण्याचं बळ मिळालं.’

जाहिरात

कल्कीनं प्रसुतीच्या काही दिवसांपूर्वीच वॉटरबर्थ प्रेग्नंसी करणार असल्याचं सांगितलं होतं. रेग्नंसीवेळी कल्कीला प्रसुतीवेदना सहन न झाल्याने तिने ऑपरेशनच्या माध्यमातून बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कल्कीने 17 तास प्रसुतीवेदना सहन केल्या आणि तिने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिने फोटो शेअर करत ट्यूलिप वुमन केअरच्या संपूर्ण टीमचे आभारही मानले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या