JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / या 5 कारणांसाठी पाहायला हवा शाहिद कपूरचा ‘Kabir Singh’

या 5 कारणांसाठी पाहायला हवा शाहिद कपूरचा ‘Kabir Singh’

अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘Kabir Singh’ हा बहुचर्चित सिनेमा 21 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

0106

अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘Kabir Singh’ हा बहुचर्चित सिनेमा 21 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रोमँटिक ड्रामा असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शिन संदिप वांगा यांनी केलं आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज लावला जात आहे. प्रेक्षकांनी कबीर सिंह का पाहावा याची ही आहेत 5 कारणं

जाहिरात
0206

कबीर सिंह हा यावर्षी रिलीज होत असलेला पहिला हार्ड कोर ड्रामा आहे. ही एका अशा प्रियकराची कथा आहे जो प्रेमात हरल्यानंतर स्वतःला पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. प्रेमातल्या वेडेपणाचा कळस गाठलेल्या या सिनेमाची तरुणाईमध्ये जास्त क्रेझ आहे.

जाहिरात
0306

कबीर सिंह हा सिनेमा अर्जुन रेड्डी या तेलुगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हा सिनेमा साउथमध्ये सुपरहिट ठरल्यानंतर संदिप वांगा यांनी या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याचं ठरवलं. त्यामुळे मूळ तेलुगू सिनेमा आणि कबीर सिंह यांच्यात काय फरक आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

जाहिरात
0406

शाहिद कपूरन याअगोदर उडता पंजाब, कमीने, हैदर यांसारख्या सिनेमामध्ये कबीर सिंह सारख्या भूमिका साकारल्या आहेत. ज्यात त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं आहे. कबीर सिंह ही भूमिका अग्रेसिव्ह, लाउड आणि स्ट्रॉन्ग दाखवण्यात आलं आहे. त्याचा रफ लुक, प्रेमातील वेडेपणा हे सर्व मोठ्या पडद्यावर पाहणं अजूनच मजेदार असणार आहे.

जाहिरात
0506

या सिनेमामध्ये शालिनी पांडेची भूमिका कियारा अडवाणी साकारत आहे. यामध्ये कियाराचा रोल खूप मोठा नसला तरी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि निरागसता याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. कबीर सिंहमध्ये कियाराचा नो मेकअप लुक पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
0606

5 जूनला सलमान खानचा भारत रिलीज झाल्यानंतर कोणताही बिग बजेट सिनेमा रिलीज झालेला नाही तसेच या सिनेमातील शाहिदचा लुक, किसिंग सीन्स इत्यादीची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. त्यामुळे कबीर सिंह हा प्रेक्षकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या