मुंबई, 17 डिसेंबर : बॉलिवूडचा सर्वात हॅन्डसम अॅक्शन हिरो जॉन अब्राहमचा आज 47 वा वाढदिवस. इरॉटिक सिनेमांतून बॉलिवूड पदार्पण करणारा जॉन त्याच्या देशभक्तीपर सिनेमांसाठी ओळखला जातो. जॉनचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असले तरी पर्सनल लाइफमध्ये मात्र तो खूपच शांतताप्रिय आहे. तो कधीच त्याच्या खासगी जीवनाबद्दल फारसं कुठे बोलताना दिसत नाही. इतकेच नाही तर त्याची पत्नी प्रिया रुंचल सुद्धा लाइम लाइटपासून खूप दूर असते. तसेच जॉन सुद्धा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पत्नीसोबत फारसे फोटो शेअर करताना दिसत नाही. आपल्या खासगी जीवनाबद्दल फार कमी बोलणाऱ्या जॉननं 2015 मध्ये लग्नाची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानं त्यानं लॉन्ग टर्म गर्लफ्रेंड प्रिया रुंचलशी लग्न केलं. एकीकडे जॉन अभिनेता आहे तर त्याची पत्नी प्रिया एक फायननशिअल एनालिस्ट आहे. या दोघांची खास गोष्ट अशी की दोघंही त्यांच्या पर्सनल लाइफमध्ये खूपच लाजाळू आहेत. त्याच्या पर्सनल लाइफमधील कोणतीच गोष्ट ही दोघंही कॅमेरासमोर शेअर करणं टाळतात. जॉननं आपल्या पत्नी बद्दल मीडियासमोर काही बोललं आहे असं फार कमी वेळी घडतं. काही दिवसांपूर्वी ‘सत्यमेव जयते’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये जॉन त्याच्या पत्नीबद्दल बोलला. त्यानं सांगितलं की, प्रिया रिलेशनशिपमध्ये मॅच्युरिटी आणि स्टेबलिटी दोन्ही ठेवते. ती खूप चांगली व्यक्ती आहे. तिला लाइम लाइट आवडत नाही. माझी फुटबॉल टीम आणि प्रॉडक्शन हाउसमागे प्रियाचं डोक आहे. त्यासाठी तिनं खूप मेहनत घेतली आहे.
जॉनच्या बोलण्यातून त्याचं त्याच्या पत्नीवर किती प्रेम आहे हे दिसून येतं. याचं एक कारण हे सुद्धा आहे की हे दोघंही शांत स्वभावाचे आहेत. प्रियाला स्वतःलाच कॅमेऱ्यासमोर येणं फारसं आवडत नाही. पण ती जॉनला नेहमीच सर्व गोष्टीत पाठिंबा देते.