JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'जोधा अकबर'मधील ही अभिनेत्री कालवश; वयाच्या तिसाव्या वर्षीच घेतला जगाचा निरोप

'जोधा अकबर'मधील ही अभिनेत्री कालवश; वयाच्या तिसाव्या वर्षीच घेतला जगाचा निरोप

टेलेव्हिजन क्षेत्रातून एक दु:खद घटना समोर आली आहे. ‘जोधा अकबर’ (Jodha akbar) या टिव्ही मालिकेत (TV series) सलीमा बेगम (Salima begum death) यांची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीनं अखेरचा श्वास घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 03 ऑक्टोबर: टेलेव्हिजन क्षेत्रातून एक दु:खद घटना समोर आली आहे. ‘जोधा अकबर’ (Jodha akbar) या टिव्ही मालिकेत (TV series) सलीमा बेगम (Salima begum death) यांची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या मनीषा यादव यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास (Manisha yadav death) घेतला आहे. त्यांनी अवघ्या 30 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. मनीषा यादव या सध्या झी वर्ल्ड सिरीजच्या जोधा अकबर या टीव्ही मालिकेसाठी काम करत होत्या. याच मालिकेत त्यांनी साकारलेल्या सलीमा बेगम व्यक्तीरेखेमुळे त्यांना सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख मिळाली होती. 30 वर्षीय मनीषा यादव यांनी शुक्रवारी रात्री जळगावात अखेरचा श्वास घेतला आहे. मनीषा यादव या गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून जळगावातील मानराज पार्क परिसरात वास्तव्याला होत्या. तसेच मागील दहा ते बारा दिवसांपासून त्याच्यावर येथीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण शुक्रवारी रात्री उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. विशेष म्हणजे त्यांना अवघा सव्वा एक वर्षांचा मुलगा देखील आहे. त्यांच्या पाश्चात पती, सव्वा वर्षांचा मुलगा, आई-वडील आणि सासू सासरे असा परिवार आहे. हेही वाचा- अखेर समंथा आणि नागा चैतन्यने घेतला घटस्फोटचा निर्णय!अभिनेत्रीने केली इमोशन पोस्ट विविध मीडिया रिपोर्टनुसार, मनीषा यादव यांचा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे (brain haemorrhage) झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मेंदूवर जास्त ताण आल्यानंतर ब्रेन हॅमरेजसारखा आजार उद्भवण्याची शक्यता असते. अशावेळी मेंदूतील रक्तवाहिन्या फुटल्याने मेंदूच्या आत रक्तस्त्राव होतो. बहुतेक वेळा असं होणं प्राणघातक ठरतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या