JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'जीव माझा गुंतला' फेम अंतराचा ग्लॅमरस अंदाज; तुम्ही पाहिला का अभिनेत्रीचा हा LOOK?

'जीव माझा गुंतला' फेम अंतराचा ग्लॅमरस अंदाज; तुम्ही पाहिला का अभिनेत्रीचा हा LOOK?

योगिता चव्हाणने २०१८ मध्ये मराठी चित्रपट ‘गावठी’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

0106

'जीव माझा गुंतला' फेम अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण नुकताच ग्लॅमरस अंदाजात दिसून आली. हे फोटो पाहून चाहते अभिनेत्रीचं जाम कौतुक करत आहेत. तसेच तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्ससुद्धा करत आहे. योगिता या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0206

योगिताने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती स्किन कलरच्या साडी कम ड्रेसमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने आपले केस मोकळे सोडले आहेत. आणि हातात एक सुंदर घड्याळ घातला आहे. योगिताचा हा सिंमल मात्र ग्लॅमरस अंदाज सर्वांनाच पसंत पडत आहे.

जाहिरात
0306

'जीव माझा गुंतला' ही कलर्स वाहिनीवरील मराठी मलिका अल्पावधीतचं प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेने अंतरा म्हणजेच योगिताला रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम दिल आहे. या मालिकेने योगिताला एक नवी ओळख मिळवून दिली आहे.

जाहिरात
0406

मूळच्या ठाण्याच्या असणाऱ्या योगिताची मुख्य अभिनेत्री म्हणून ही पहिलीच मालिका आहे. याआधी योगिताने बापमाणूस, जाडूबाई जोरात, नवरी मिळे नवऱ्याला अशा मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. तसेच भाकरवाडी या हिंदी मालिकेमध्येही काम केलं आहे.

जाहिरात
0506

तसेच योगिता चव्हाणने २०१८ मध्ये मराठी चित्रपट 'गावठी' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आज या मालिकेने योगिताला अभिनय क्षेत्रात एक वेगळं स्थान मिळवून दिल आहे.

जाहिरात
0606

जीव माझा गुंतला मालिकेमध्ये सध्या अंतरा आणि मल्हारचं लग्न झालेलं असून. या दोघांमध्ये सतत वादावादी होत आहेत. या दोघांमध्ये प्रेमाची कळी कधी उमलणार याकडे रसिक प्रेक्षकांचं मन लागलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या