JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कोरोनाचा कहर ओळखून आलिया-जान्हवीनं घेतला मोठा निर्णय, चाहत्यांकडे केली 'ही' विनंती

कोरोनाचा कहर ओळखून आलिया-जान्हवीनं घेतला मोठा निर्णय, चाहत्यांकडे केली 'ही' विनंती

कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) चाहत्यांना खास आवाहन केले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जानेवारी- नवीन वर्षाला सुरूवात झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून ओमिक्रॉन आणि कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अनेक शहरांमध्ये अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रेस्टॉरंट, मॉल्स, सिनेमा हॉल इत्यादींना 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 2020 आणि 2021 पेक्षा हे वर्ष चांगले जाईल आणि कोरोनाचा कहर कमी होईल, अशी आशा सर्वांना आहे. अशा स्थितीत आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) चाहत्यांना खास आवाहन केले आहे. आलिया भट्ट, (Alia Bhatt) आणि जान्हवी कपूरने चाहत्यांना पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे की, कोरोना अजून संपलेला नाही. त्यांनी इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मुंबई पोलिस आयुक्तांच्या आवाहनाचाही उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, ‘रिपोर्ट्सनुसार मुंबईत 8000 हून अधिक केसेस आढळून आल्या आहेत. त्यापैकी चांगली गोष्ट म्हणजे 89 टक्के केस या असिंप्टोमॅटिक आहेत . मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी देखील कोविड बाधित होम क्वारंटाईन झालेल्यांना संसर्ग टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येकाला कोरोनाच्या नियमांचे योग्या पालन करण्यास सांगितले आहे. Janhvi Kapoor and alia bhatt requests fans to foloow covid 19 rules पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे की, सध्यस्थिती ही घाबरण्यासारखी नाही. तरीही प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. परस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. जान्हवी कपूर आणि आलिया भट्ट यांनी पोस्ट शेअर करत कोरोना नियमांचे पालन करण्यांचे चाहत्यांना आवाहन केले आहे. वाचा- बॉलिवू़डमध्ये कोरोनाचा कहर! आज तीन नावांची पडली भर, एकतालाही लागण वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर जान्हवी कपूर शेवटची ‘रुही’ चित्रपटात दिसली होती. तसेच ती तमिळ चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘गुड लक जेरी’ ’ (Good Luck Jerry) चित्रपटाचाही भाग आहे. ती ‘दोस्ताना 2’ मध्येही दिसणार आहे. याशिवाय जान्हवी ‘तख्त’ या मल्टीस्टारर चित्रपटात दिसणार आहे. ज्यात तिच्यासोबत रणवीर सिंह, करीना कपूर खान, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर दिसणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या