रिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा मांजरावर प्रेम करेन - जॅकलीन फर्नांडिस

जॅकलीनने सांगितले की, मी कित्येकदा प्रवास करते आणि मला आयुष्यातील महत्त्वाच्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून देखील खूप आनंद मिळतो.

Sonali Deshpande
मुंबई, 4 सप्टेंबर : आपल्या पसंतीच्या सेलिब्रिटीजच्या माहीत नसलेल्या आतील गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत का? वूट ओरिजिनल 'फिट  अप विथ द स्टार्स' ने आपल्या सर्व १० एपिसोडच्या मनोरंजनामध्ये तुमच्या पसंतीच्या स्टार्सना घेऊन येत आहेत. जॅकलिन फर्नांडिस या भागात खूप मनमोकळी बोललीय.  जेव्हा अनैता श्रॉफ अदजॅनियाने जॅकलिनला तिच्या नाते संबंधांबद्दल विचारणा केली तेव्हा तिने म्हटले की, ' एखाद्या रिलेशनमध्ये राहण्यापेक्षा मांजरावर प्रेम करणे अधिक चांगली गोष्ट आहे.'जॅकलिन फर्नांडिस देशातील तरुणांच्या हृदयावर राज्य करत आहे. अनैताने जॅकलीनला विचारले की तुला कोणत्या प्रकारचे लोक आणि कशा प्रकारच्या डेटिंग्स करायला आवडतात? जॅकलीनने सांगितले की, मी कित्येकदा प्रवास करते आणि मला आयुष्यातील महत्त्वाच्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून देखील खूप आनंद मिळतो.एखाद्या व्यक्तीबरोबर जर डेटवर जायची इच्छा असेल तर तो व्यक्ती परिपूर्ण नसेल तरी चालेल पण, जो चांगले कपडे घालू शकतो आणि ती त्याच्यासोबत बिनधास्त असू शकते, अशा व्यक्तीसोबत डेटवर जाणे पसंत करेन.तिला विशेष आवडत्या व्यक्तीसोबत नॉर्थन लाईट बघण्याची इच्छा आहे.

VIDEO : 'मी पुलाखाली अडकलो, तुम्ही मला ओळखता का?'

Trending Now