JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / योग करून या 5 अभिनेत्री ठेवतात स्वतःला फिट आणि सेक्सी

योग करून या 5 अभिनेत्री ठेवतात स्वतःला फिट आणि सेक्सी

पंतप्रधानांनी २७ सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत भाषणावेळी योग दिवसाचा प्रस्ताव सादर केला होता. यानंतर हा प्रस्ताव मान्य होऊन २०१५ पासून योग दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होऊ लागला.

0106

जगभरात योग दिवस साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे.२०१५ पासून दरवर्षी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. पंतप्रधानांनी २७ सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत आपल्या भाषणावेळी योग दिवसाचा प्रस्ताव सादर केला होता. यानंतर हा प्रस्ताव मान्य होऊन २०१५ पासून योग दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होऊ लागला. अनेक बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या फिटनेसचं यश योग साधनेला देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या नियमित योग साधना करतात.

जाहिरात
0206

शिल्पा शेट्टी- शिल्पा तिच्या फिटनेससाठी फार प्रसिद्ध आहे. एका मुलाची आई असूनही शिल्पाचा फिटनेस वाखाण्याजोगा आहे. ती याचं सारं श्रेय योगला देते. ४४ वर्षीय शिल्पाने एका मुलाखतीत म्हटलं की, योग साधनेमुळे तिचं आयुष्य खऱ्या अर्थाने रुळावर आलं आहे.

जाहिरात
0306

मलायका अरोरा- मलायका अनेकदा जिमला जाताना दिसते. जिममध्ये नियमित व्यायाम करण्यासोबतच ती योगही करते. हेच तिच्या फिटनेसचं गमक आहे. ४५ वर्षीय मलायका योग करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

जाहिरात
0406

आलिया भट्ट- बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये आलियाच्या नावाचा उल्लेख आवर्जुन केला जातो. स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती नियमीत योग करते. अष्यांग योग करणं तिला सर्वाधिक आवडतं. आठवड्यातून दोनदा ती अष्टांग योग करते. याशिवाय ती मेडिटेशनही करते. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी तिचं वजन ६७ किलो होतं. पण स्टुडंट ऑफ दी इअर सिनेमासाठी तिने तब्बल १६ किलो वजन कमी केलं होतं.

जाहिरात
0506

कविता कौशिक- चंद्रमुखी चौटाला नावाने प्रसिद्ध असलेल्या कविता कौशिक गेल्या अनेक वर्षांपासून योग साधना करत आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक नजर टाकली तर तिचे बहुतांश फोटो हे योग करतानाचेच दिसतील. ३८ वर्षांची कविता फार फिट आहे.

जाहिरात
0606

बिपाशा बासु- बंगाली ब्युटी फिटनेसची किती वेडी आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणे बिपाशाही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर योग साधना करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ४० वर्षीय बिपाशाला कपालभाती, अनलोम विलोम, मंडूकासन ही योगासनं आवडतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या