हैदराबादच्या मानसा वाराणसीने नुकतीच VLCC फेमिना मिस इंडिया 2020 (VLCC Femina Miss India-2020) हा मानाचा पुरस्कार जिंकला आहे.
हैदराबादच्या मानसा वाराणसीने नुकताच VLCC फेमिना मिस इंडिया 2020 हा पुरस्कार जिंकला आहे. तिने हा पुरस्कार जिंकल्याने हैदराबादकरांनी तिचं जंगी स्वागत केलं आहे.
तिच्या या स्वागताचे फोटोज आणि व्हिडिओज इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तिचं बुधवारी मुंबईहून हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं आहे.
यावेळी तिचा मित्र परिवार आणि कुटुंबियांनी तिचं जोरदार स्वागत केलं आहे. विमानतळावर पोहोचल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील हास्य थांबतचं नव्हतं. तिला अनेकांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केलं आहे.
अनेक कठीण परिस्थितीवर मात करत तिने या किताबावर आपलं नाव कोरलं आहे. सुरुवातीला तिच्या घरातूनच मॉडेलिंग क्षेत्रात काम करण्याला प्रचंड विरोध होता. पण तिने घरच्यांपुढे मान न तुकवता आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.
मॉडेलिंग क्षेत्रात उतरणं सुरुवातीला तिच्या आजीला फारसं आवडलं नव्हतं. पण या क्षेत्रात तिची होणारी प्रगती पाहून घरच्यांचा विरोध मावळला आणि त्यांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केल्या. पालकांच्या आणि मित्र परिवारांच्या पाठिंब्यामुळेचं हे यश मिळू शकलं असल्याचं तिने सांगितलं आहे.
डोक्यावर मुकुट आणि अंगावर लाल रंगाचे कपडे घातलेली मानसा जंग जिंकून आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. तिच्या स्वागतासाठी हैदराबादमधील बायकर्सचा ताफा 5 किमी इतका लांब होता.
“मुकुट जिंकल्याच्या आनंद गगनात मावत नाही. या क्षणाला मला किती चांगलं वाटत आहे याच वर्णनही मी करू शकत नाही. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. हा प्रवास करताना माझ्या जीवनात अनेक चढ उतार आले. घरी परत येऊन अशाप्रकारे आनंद साजरा करणं माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. ” अशी प्रतिक्रिया नवीन मिस इंडियाने व्यक्त केली आहे.