मुंबई, 23 फेब्रुवारी : भटिंडा येथील सनी हिंदुस्थानी याने इंडियन आयडॉलच्या विजेतेपदावर (Indian Idol 11 Winner) आपलं नाव कोरलं आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून येणाऱ्या सनीची आई फुगे विकण्याचा व्यवसाय करत होती. तर सनी स्वत: उपजीविकेसाठी बूट पॉलिश करत असे. गरीब कुटुंबातील सनीने सर्वांना मागे टाकत इंडियन आयडॉलचं विजेतपद पटकावल्याने त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रातील रोहित हा या स्पर्धेचा उपविजेता ठरला. विजेतेपद पटकावणाऱ्या सनी हिंदुस्थानीला 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसंच भुषण कुमारने त्याला टी-सीरीजच्या आगामी सिनेमात गाण्याचं कॉन्ट्रॅक्टही देऊन टाकलं आहे. तसंच टाटा कंपनीची नवी एल्ट्रॉज कारही सनी हिंदुस्थानीला मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या रोहितला 5 लाखांचं बक्षीस देण्यात आलं आहे.