दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी तिच्या चित्रपटांबरोबरच महेंद्र सिंह धोनीची एक्स गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाते.
दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी तिच्या चित्रपटांबरोबरच महेंद्रसिंह धोनीची एक्स गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाते.
इन्स्टाग्रामवर नुकताच राय लक्ष्मीने आपल्या साखरपुड्याची तारीख जाहीर केली आहे. 27 एप्रिलला ती साखरपुडा करणार आहे.
राय लक्ष्मी आणि धोनी यांच्या नात्याच्या चर्चा सुद्धा खूप रंगल्या होत्या. या दोघांची भेट 2008 मध्ये आयपीएलच्या दरम्यान झाली होती. मात्र काही वेळेनंतर त्यांचा ब्रेकअप झाला होता.
अद्यापही कोणालाच समजलं नाही की त्यांच्यातील नात का तुटलं होतं ? मात्र राय लक्ष्मीने बऱ्याचवेळा म्हटलं आहे की धोनीसोबत नातं ही तिची सर्वात मोठी चूक होती.
लक्ष्मीच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर, तिने 2005 मध्ये एका तमिळ चित्रपटातून आपल्या करीयरची सुरुवात केली होती. याच वर्षी तिचे आणखी 4 चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाले होते.
राय लक्ष्मीने तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांत काम केलं आहे. दक्षिण चित्रपटांनंतर तिने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती.
2016 मध्ये आलेल्या 'अकिरा' या हिंदी चित्रपटात ती झळकली होती. त्यांनतर तिने जुली 2, ऑफिसर अर्जुन सिंग ips बच 2000 मध्ये सुद्धा काम केलं आहे.