मुंबई, 01 एप्रिल : तुला पाहते रे मालिका सध्या कमालीची वेगवान चाललीय. अतिशय भाबडी वाटणारी ईशा आता बघता बघता बदलली. स्मार्ट झाली. गजा पाटील हा सरंजामे कंपनीत मोठा भ्रष्ट माणूस आहे आणि तो कित्येक वर्ष सरंजामे कंपनीला फसवत आहे हे ईशाला समजताच ती गजा पाटीलच्या मागावर लागते. या प्रकरणाने विक्रांत मात्र पुरता हादरतो. त्याला आता असं वाटू लागतं की जर ईशाने या प्रकरणाचा छडा लावला तर तिला हे समजणार की गजा पाटील म्हणजेच विक्रांत सरंजामे. त्यामुळे घाबरलेला विक्रांत भलत्याच माणसाला गजा पाटील म्हणून सगळ्यांसमोर पेश करतो. मात्र विक्रांतच्या दुर्भाग्याने काही दिवसातच विक्रांत हाच गजा पाटील आहे हे ईशाला समजतं आणि तिच्या पायाखालची जमीनच हादरते. त्यातच विक्रांत हा सरंजामे फॅमिलीचा मुलगा नसून जावई आहे हे सुद्धा तिला कळतं आणि इतका मोठा विश्वासघात केल्यामुळे ईशा पुरती मनाने तुटते. खचून जाते. अशीच एकदा भेदलेल्या अवस्थेत ईशा रस्त्यातून जात असताना ट्रक उडवणार तोच जोगतीण तिचा हात खेचते आणि तिला वाचवते. तसंच ईशाचा जन्म हा एका उद्देशाने झाल्याचे ती आठवण करून देते. समोर ठेवलेल्या परातीतल्या पाण्यात ती ईशाला बघायला सांगते. ईशा परातीत बघते आणि तिला राजनंदिनीचा चेहरा दिसतो. ईशा हीच राजनंदिनी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न विक्रांत सरंजामे करत असताना, ती खरीच गेल्या जन्मी राजनंदिनी होती, असं मालिकेत दाखवलंय. त्यामुळे आता या मालिकेत ईशाच डाॅमिनेटिंग होणार. EXCLUSIVE : राजकारणात चारित्र्याबाबत आरोप झाल्यावर वेदना होतात? नवनीत राणांची मुलाखत