Swarajyrakshak Sambhaji, Dr. Amol Kolhe - संभाजी मालिकेत बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. इतिहासाची एक एक पानं उलटली जातायत
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. संभाजी राजे अकबराला जाऊन भेटले. इकडे औरंगजेब स्वराज्यावर चाल करायला टपलाय. रायगडावर युद्धनीती आखली जातेय. अशातच एक गोड बातमी येते.
येसूबाईंना खूप आनंद होतो. त्यांना ही बातमी संभाजी महाराजांना द्यायचीय. पण त्यांची भेटच होत नाहीय. म्हणून येसूबाई नाराज आहेत.
अकबराला भेटल्यानंतर संभाजी महाराज येसूबाईंना भेटायला येतात. ते आलेत हे रायगडावर खूप कमी जणांना माहीत असतं. महालात लपून ते येसूबाईंना आश्चर्याचा धक्का देतात.
आता पुढच्या काही भागांमध्ये शाहू महाराजांचा जन्म दाखवला जाईल. इतिहासाचं आणखी एक पर्व आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अर्थात, संभाजी महाराज औरंगजेबाचा सामना करायला सरसावलेत. येत्या काही भागात युद्ध, रणनीती अशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत.