Ratris Khel Chale, Zee Marathi - अण्णा शेवंताकडे राहायला येतात. अण्णांच्या घरी सगळे टेंशनमध्ये आहेत
'रात्रीस खेळ चाले' मालिकेत सतत काही ना काही वळणं येत असतात. आताही प्रेक्षकांना वेगळं चित्र बघायला मिळणार आहे.
पाटणकर आपल्या मुलीला घेऊन मुंबईला जातात. ते दोन दिवस येणार नसतात. तेव्हा अण्णा शेवंताकडे राहायला येतात.
अण्णा चोंट्याला पैसे देऊन घराला बाहेरून कुलूप लावायला सांगतात. पैसे मिळाल्यानं चोंट्या दारू प्यायला जातो.
दत्ता ती चावी घेऊन पाटणकरांच्या दारात जातो. दाराला बाहेरून कुलूप असतं. दत्ता चावीनं दार उघडणार इतक्यात अण्णा दत्ताला पाहतात.
रात्रीस खेळ चाले मालिकेत शेवंता आणि अण्णा एकदम युएसपी. या आठवड्यात प्रेक्षकांना त्यांचाच रोमान्स पाहायला मिळणार आहे.