रात्रीस खेळ चाले मालिकेत अण्णा आणि काशी आमने सामने येतात. मग पाहा काय होतं ते.
वच्छीला हे कळल्यावर तीही घाबरून जाते. काही करून काशी अण्णांच्या नजरेसमोर यायला नको, असं तिला वाटतंय.
काशी शेवंताच्या घरी जाऊन मी अण्णा नाईक म्हटल्यावर शेवंता घाबरून जाते. वेडा काशी हे गावभर बडबडत राहिला तर ती अडचणीत येईल, याची तिला जाणीव होते.
अण्णा काशीला झाडाला उलटा टांगतात. अख्खं गाव जमा होतं. काशी अर्धमेला झालाय. क्रूर अण्णांचा कारनामा सगळे बघतायत.