मुंबई,29ऑक्टोबर- मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आपला प्रत्येक सीन परफेक्ट व्हावा, यासाठी वाटेल ते कष्ट घ्यायला तयार असतात. अशा प्रसंगी बऱ्याचवेळा त्यांना भयानक घटनांनादेखील समोर जावं लागतं. असंच काहीसं झालं आहे, मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुखसोबत**(Mayuri Deshamukh**). हिंदी मालिका ‘इमली’(Imlie) च्या सेटवर ही भयानक घटना घडली आहे.
स्टार प्लसवर ‘इमली’ ही मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेत मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखसुद्धा मुख्य भूमिकेत आहे.ही मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिका सतत टीआरपी रेसमध्ये चांगल्या स्थानावर असते. अशातच मालिकेत रंजक दृश्य चित्रित केलं जातं होतं. या दृश्यामध्ये मालिनी अर्थातच मयुरी देशमुख एक फोटो घेऊन बसलेली असते. आणि या फोटोला आग लावण्याचा हा दृश्य होता. सगळं काही सुरळीत सुरु असताना, अचानक मयुरीच्या लक्षात येतं की या आगीची एक ठिणगी आपल्या साडीवर येत आहे. तिने प्रसंगावधान राखत ही घटना सांभाळून घेतली. त्यामुळे सुदैवाने तिला कोणतीही इजा झालेली नाहीय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्री मयुरी देशमुख ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. या मालिकेने मयुरीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. मालिकेत अभिज्ञा भावे तिच्या बहिणीच्या भूमिकेत होती. मयुरीने या मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारली होती. सध्या अभिज्ञा आणि मयुरी दोघीही हिंदी मालिकेतून आपल्या भेटीला आल्या आहेत. अभिज्ञा ‘पवित्र रिश्ता २’मध्ये तर मयुरी देशमुख ‘इमली’ मधून आपलं मनोरंजन करत आहेत. (हे वाचा: म युरी देशमुख साकारणार खलनायिकेची भूमिका; या मालिकेत झळकणार ) अभिनेत्री मयुरी देशमुख प्रसिद्ध हिंदी मालिका इमली मध्ये काम करत आहे. त्यातील तिची मलिनीची भूमिका हिट ठरत आहे. पण आता ती खलनायिकेच्या रुपात दिसत आहे.स्टार प्लस वाहिनीच्या या मालिकेत मयुरीसह मराठी अभिनेता गष्मिर महाजनी ही आहे.सुरुवातीपासूनच मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मयुरी च काम मराठीप्रमाणेच हिंदीतही हीट ठरत आहे. मालिनी हे पात्र अतिशय समजूतदार आणि संयमी दाखवण्यात आलं होत. पण आता ते नकारात्मक झालं आहे. मालिकेत आदित्य म्हणजेच मलिनीचा नवरा हा इमलीच्या प्रेमात आहे. हळू हळू मालिनीच्या गोष्टी लक्षात आल्या लागल्या आहेत.अनेक मालिकांमध्ये मयुरी ही सोज्वळ आणि सालस भूमिका साकारत आली आहे. त्यामुळे तिचं हे वेगळं रूप प्रेक्षकांसाठी एक सरप्राईजचं आहे.