JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘अश्लील सीन न केल्यामुळं झाली बेरोजगार’; बिग बॉस फेम अभिनेत्री निर्मात्यांकडे मागतेय काम

‘अश्लील सीन न केल्यामुळं झाली बेरोजगार’; बिग बॉस फेम अभिनेत्री निर्मात्यांकडे मागतेय काम

या अभिनेत्रीकडे निर्माते करतायेत टॉपलेस दृश्यांची मागणी; अभिनेत्रीनं केली बॉलिवूडची पोलखोल

0110

स्प्लिट्सविला या रिअलिटी शोमधून नावारुपास आलेली पवित्रा पुनिया छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Pavitra Punia/Instagram)

जाहिरात
0210

अलिकडेच ती बिग बॉसमध्ये देखील झळकली होती. यामध्ये तिनं टाकलेला ग्लॅमरचा तडका अनेकांना आवडला आहे. (Pavitra Punia/Instagram)

जाहिरात
0310

मात्र इतकी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून देखील पवित्रा अद्याप बेरोजगार आहे. (Pavitra Punia/Instagram)

जाहिरात
0410

बिग बॉसमध्ये झळकलेल्या प्रत्येक सेलिब्रिटीला त्याच्या करिअरमध्ये उंची गाठण्याची संधी मिळते. परंतु पवित्राच्या बाबतीत मात्र असं काहीही घडलं नाही. आजही ती चांगल्या मालिकेच्या शोधात आहे. (Pavitra Punia/Instagram)

जाहिरात
0510

पवित्रानं अलिकडेच फ्री प्रेसला दिलेल्या मुलाखतीत तिच्या बेरोजगारीचं कारण सांगितलं. तिनं मनोरंजन क्षेत्रातील अश्लीलतेला जबाबदार धरलं आहे. (Pavitra Punia/Instagram)

जाहिरात
0610

ती म्हणाली, बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर तिला अनेक वेब सीरिजच्या ऑफर मिळाल्या होत्या. परंतु तिनं त्यांना नकार दिला. कारण त्यामध्ये तिला बोल्ड सीन करावे लागणार होते. (Pavitra Punia/Instagram)

जाहिरात
0710

प्रत्येक दिग्दर्शक तिच्याकडे बोल्ड आणि टॉपलेस सीनची मागणी करत होता. अन् असे कुठलेही सीन तिला द्यायचे नाही तिला केवळ चांगला अभिनय करायचा आहे. त्यामुळं तिनं नकार दिला. (Pavitra Punia/Instagram)

जाहिरात
0810

यापूर्वी असाच काहीसा प्रकार स्प्लिट्सविलानंतर तिच्याबाबतीत घडला होता. तेव्हा तर तिला काही सॉफ्ट पॉर्न चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या परंतु तिनं थेट नकार दिला. (Pavitra Punia/Instagram)

जाहिरात
0910

पवित्रा पुनिया यापूर्वी नागिन, ससुराल सिमर का, डायन, ये है मोहबत्तें, कवच यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. (Pavitra Punia/Instagram)

जाहिरात
1010

अभिनयासोबतच ती आपल्या खासगी आयुष्यामुळं देखील चर्चेत असते. सध्या ती एजाज खानसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहात आहे. (Pavitra Punia/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या