JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लेकीलाच म्हणाली 'लग्न करू नकोस'; श्वेता तिवारीने पलकला का दिला असा सल्ला?

लेकीलाच म्हणाली 'लग्न करू नकोस'; श्वेता तिवारीने पलकला का दिला असा सल्ला?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी कायम चर्चेत असते. श्वेता दोन वर्षांच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ‘मैं हूं अपराजिता’ या मालिकेतून श्वेता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

जाहिरात

shweta tiwari

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 सप्टेंबर: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी कायम चर्चेत असते. श्वेता दोन वर्षांच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ‘मैं हूं अपराजिता’ या मालिकेतून श्वेता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये ती एक सिंगल मदर भूमिका बजावताना दिसणार आहे. एकटी कशी तीन मुलींना सांभाळते, मोठं करते हे मालिकेतून पहायला मिळणार आहे. ही स्टोरीही तिच्या वैयक्तिक आयुष्याशी मिळती जुळती आहे. श्वेता तिवारी ETimes ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या दोन अयशस्वी विवाहांबद्दल बोलताना दिसली. दोन अयशस्वी लग्नानंतर तिचा लग्नाविषयीचा विचार पूर्णपणे बदलला आहे आणि तिने आपली मुलगी पलक तिवारीला लग्न न करण्याचा सल्लाही दिला आहे. हेही वाचा -  Koffee with Karan 7 : वरुणच्या उत्तरानं जिंकलं चाहत्यांचं मन; म्हणाला अभिनेता नाही तर ‘ही’ अभिनेत्री माझी स्पर्धक दोन अयशस्वी लग्नानंतर श्वेता तिवारी म्हणाली, ‘माझा लग्नावर विश्वास नाही. त्यामुळे मी पलकला लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र आयुष्य तिचं आहे मी तिला तिचं आयुष्य कसं जगायचं हे सांगत नाहीये मात्र तिनं कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करावा असं मला वाटतं’. ‘फक्त तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात म्हणून लग्न करण्याची गरज नाही. आयुष्यात लग्न आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं आणि त्याशिवाय आयुष्य कसं चालेल असं नसावं’, असंही श्वेता यावेळी म्हणाली. प्रत्येक लग्न वाईट नसते. माझे बरेच विवाहित मित्र आनंदी आहेत, परंतु मी काही तडजोड देखील पाहिली आहे जी त्यांच्या आणि त्यांच्या मुलांसाठी चांगली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या