मुंबई, 20 फेब्रुवारी- शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आणि फरहान अख्तर (Farhan Akhtar) यांनी शनिवारी खंडाळ्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या या लग्नसोहळ्यास कुटुंबातील सदस्यांसह काही मोजक्या मित्रांनी हजेरी लावली होती. या लग्नात फऱहानचा जवळचा मित्र ऋतिक रोशन (Hrithik Roshan) देखील सहभागी झाला होता. मित्राच्या लग्नात ऋतिकने जबरदस्त डान्स केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रविवारी एका फॅन अकाउंटने फरहान आणि ऋतिकचा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमातील ‘सेनोरिटा’ या गाण्यावर डान्स करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हे दोघे या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहे. ‘सेनोरिटा’ गाण्यावर थिरकले फरहान-ऋतिक ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा सिनेमा 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात फरहान आणि ऋतिकने इमरान आणि अर्जुन या दोन मित्रांची भूमिका साकारली होती. चाहत्यांकडून या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, ‘‘सो होलसम’’ तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, फ्रेंडशिप गोल..तर आणखी एकाने म्हटलं आहे की, ‘‘अर्जुन आणि इमरान..’’
एक दुसरा व्हिडिओ देखील फॅन पेजने शेअर केला होता. यामध्ये फरहान शिबानीसोबत ‘दिल चाहता है’ या गाण्यावर डान्स करताना दिसला. ऋतिक देखील डान्स करताना दिसला. यावेळी फराह खान देखील दिसली.
शिबानी आणि फरहानचे लग्न वडील जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळा येथील घरात मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पडले. या लग्नात फराह खान, रिया चक्रवर्ती, सतीश शाह, आशुतोष गोवारिकर आणि रितेश सिधवानी यांच्यासह अन्य सेलेब्स सहभागी झाले होते. शिबानीची बहीण अनुषा दांडेकर, अपेक्षा दांडेकर आणि बेस्ट फ्रेंड रिया चक्रवर्ती देखील या लग्नात सहभागी झाली होती. वाचा- ट्विंकल खन्ना या आजाराचा करतेय सामना; फॅन्स म्हणाले, ‘काळजी करू नकोस’ मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर फरहान आणि शिबानीच्या घऱची मंडळी मुंबईला परतली आहे. यानंतरचे कार्यक्रम मुंबईत होणार आहेत. या कार्यक्रमात कोण कोण सहभागी होणार याची माहिती समोर आलेली नाही.