व्हेकेशन मोडवर असलेल्या नुसरतनं नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बिकीनी फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भारुचानं फार कमी वेळात सिनेइंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला तिचा सिनेमा 'ड्रीमगर्ल'चं यश एंजॉय करत आहे.
अभिनयाव्यतिरिक्त आपल्या फॅशन सेन्समध्येही नेहमीच टॉपला राहणारी नुसरत सोशल मीडियावरील तिच्या फोटोंमुळे अनेकदा चर्चेत असते.
सध्या ती व्हेकेशन मोडवर असलेल्या नुसरतनं नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बिकीनी फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.
नुसरतच्या या बोल्ड बिकिनी अवतारानं तिचे चाहते घायाळ झाले आहेत. याआधीही तिनं समुद्र किनाऱ्यावरील बिकिनी फोटो शेअर केले होते.
पण नुसरतच्या या बिकिनी फोटोंची चर्चा होण्यामागचं कारण आहे ते म्हणजे तिचा टॅटू. नुसरतच्या कमरेखाली असलेला टॅटू या फोटोंमध्ये दिसत आहे.
अशाप्रकारे बिकिनी फोटो शेअर करायची नुसरतची ही पहिलीच वेळ नाही याआधीही तिनं शेअर केलेला रेड बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.