JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ही तरुणी डोळ्यांनीच घेऊ शकते तुमचा जीव; राम गोपाल वर्मांनी केलं सावध, पाहा PHOTOS

ही तरुणी डोळ्यांनीच घेऊ शकते तुमचा जीव; राम गोपाल वर्मांनी केलं सावध, पाहा PHOTOS

KHATAM Song Promo:बॉलीवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘डी कंपनी’ (D Company) चित्रपटातील ‘खतम’ गाण्याचा पोस्टर शेअर केला आहे.

0105

मुंबई: बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीला कलाटणी देणार 'डी कंपनी' नवाचा चित्रपट घेवून येत आहेत. हा चित्रपट कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या जीवनावर अधारित आहे.

जाहिरात
0205

या चित्रपटातील बहुचर्चित 'खतम' या गाण्याचा प्रोमो नुकताच युट्युबवर प्रदर्शित केला आहे. अवघ्या काही मिनिटांतच हे 'खतम' गाण्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रोमो 29 सेकंदाचा असून आतापर्यंत या व्हिडिओला जवळपास 12 हजार जणांनी पाहिलं आहे.

जाहिरात
0305

या प्रोमोबाबत माहिती देणारं एक ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे. याला त्यांनी एक मजेशीर कॅप्शन लिहिलं आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'केवळ अप्सरा राणी यांच्या हातातील चाकूने जीव जाईल, असं नाही. तिच्या डोळ्यांनीही एखाद्याची हत्या होऊ शकते.' त्यांच्या या ट्विटवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

जाहिरात
0405

'डी कंपनी'च्या खतम गाण्यात अभिनेत्री अप्सरा राणीने जबरदस्त डान्स केला आहे. तिच्या व्यतिरिक्त 'डी कंपनी' या चित्रपटात अभिनेता अश्वत कंठ दाऊच्या भूमिकेत तर भाऊ रुद्र कंठ शब्बीर इब्राहिम कास्करच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्कंठा निर्माण झाली आहे.

जाहिरात
0505

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी यापूर्वी त्यांच्या अनेक चित्रपटांत गॅंगवॉर दाखवले आहेत. पण त्यांचा 'डी कंपनी' हा चित्रपट विशेष असणार आहे. तसेच हा चित्रपट बॉलीवूडला कलाटनी देणारा चित्रपट ठरेल असंही त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. या चित्रपटाची कथा अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीवर अधारित आहे. त्यामुळे तथ्याच्या अधिक जवळ जाणार हा चित्रपट आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या