JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'या' घरगुती उपायांनी रिंकूने दोन महिन्यात कमी केलं 12 किलो वजन

'या' घरगुती उपायांनी रिंकूने दोन महिन्यात कमी केलं 12 किलो वजन

रिंकू राजगुरू म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती बुलेट चालवणारी आर्ची. नुकताच तिचा मकरंद माने दिग्दर्शित कागर सिनेमा प्रदर्शित झाला

0110

रिंकू राजगुरू म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती बुलेट चालवणारी आर्ची. नुकताच तिचा मकरंद माने दिग्दर्शित कागर सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. यात रिंकूने राजकारणी मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. राजकीय पार्श्वभूमी असलेला कागर हा एक प्रेमपट होता.

जाहिरात
0210

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आर्चीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात ती डान्सचा सराव करताना दिसत होती. त्यात रिंकू कमालीची बारीक दिसत होती. रिंकूनं इतकं वजन कमी कसं केलं? हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. म्हणून आम्ही थेट रिंकूशीच संवाद साधला.

जाहिरात
0310

रिंकूनं आमच्याशी दिलखुलास बातचीत केली. ती म्हणाली, 'सैराट संपला आणि काही दिवसांनी माझ्या लक्षात आलं की मी कमालीची जाडी झालीय. तेव्हा मी दहावीची परीक्षा देत होते. इतकं जाडं असणं आरोग्यासाठी चांगलं नाहीच मुळी. म्हणून मी ठरवलं आता आपलं वजन कमी करायचं.'

जाहिरात
0410

वजन कमी करण्याचा मी निश्चय केला होता. मी पहाटे चार वाजता उठून व्यायाम करायचे. व्यायाम म्हणजे चालायचे. वाॅर्मअप आणि मग व्यायाम.' तिनं आपल्या डाएटकडेही विशेष लक्ष दिलं होतं.

जाहिरात
0510

ती म्हणाली, 'मी सकाळ आणि संध्याकाळ फक्त सलाड खात होते. मला गोड जास्त आवडतं, पण तेही मी सोडलं. घरात गुलाबजाम वगैरे गोड पदार्थ बनत असतील तर मी तिथे फिरकायचीही नाही.' इतकंच काय रिंकूसमोर कुणी गोड पदार्थ खात असेल तर ती तिथून उठून निघून जायची.

जाहिरात
0610

यासाठी तिनं कुणी ट्रेनर नव्हता ठेवला. ती सांगते, तिची आईच तिची ट्रेनर आणि डाएटिशियन, या सगळ्याचा फायदा असा झाला की, २ ते ३ महिन्यात तिचं १२ किलो वजन कमी झालं.

जाहिरात
0710

मध्यंतरी तिनं एक दक्षिणेकडचा सिनेमा केला होता. पण तो फारसा चालला नाही. तरीही ती सांगते, 'वेगळ्या भाषेतला सिनेमा बरंच काही शिकवून गेला. भाषा शिकता आली.' दक्षिणेकडेही लोकांनी जास्त मराठी सैराटच पाहिल्याचं ती सांगते.

जाहिरात
0810

'सैराट'नं रिंकूला प्रचंड प्रसिद्धी दिली. त्याबद्दल बोलताना ती सांगते, 'पहिल्यांदा अवघडल्यासारखं व्हायचं. पण वेगवेगळ्या लोकांना भेटताना छान वाटलं.' रिंकू तरुणपिढीला काही सल्लाही दतेय. तो खूप महत्त्वाचा आहे.

जाहिरात
0910

ती म्हणते, ' सैराटनंतर खेडेगावातल्या मुलामुलींना सिनेमाची ऑफर देणारे भेटतात. तेही हुरळून जातात. पण कुणीही येऊन सिनेमा करतो म्हणाला तर सावध राहा.' ती म्हणते, ' रिंकूला ओळख आर्चीनं दिली. आणि मीही फार वेगळी नाही. मी आर्चीसारखीच आहे.'

जाहिरात
1010

दरम्यान, नुकताच तिच्या तिसऱ्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. मेकअप असं या सिनेमाचं नाव असून गणेश पंडित लिखीत आणि दिग्दर्शित मेकअप सिनेमाच्या या टीझरमध्ये रिंकू बांधकाम सुरू असलेल्या एका उंच इमारतीवर मद्यपान करताना दिसते. मद्यधुंद अवस्थेत ती शहराला आणि घरच्यांना शिव्याही देत आहे. तिला मेकअप करायला न दिल्याचा राग तिच्या प्रत्येक वाक्यात दिसतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या