अमेरिकन गायक आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासनं नुकताच त्याच्या 27वा वाढदिवस साजरा केला.
अमेरिकन गायक आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासनं नुकताच त्याच्या 27वा वाढदिवस साजरा केला. लग्नापूर्वी आणि नंतर निक आणि प्रियांका त्यांच्या वयातील अंतरामुळे नेहमीच चर्चेत राहिले.
निक आणि प्रियांकाच्या लग्नाला 10 महिने होत आले. स्वतःहून 11 वर्षांनी लहान असलेल्या निकसोबत प्रियांकानं लग्न केलं त्यामुळे त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली.
पण, तुम्हाला माहीत आहे का, निकची प्रियांका ही काही पहिली गर्लफ्रेंड नाही. 27 वर्षांच्या निकची प्रियांका ही 10 वी गर्लफ्रेंड होती. चला तर मग त्याच्या हॉलिवूडमधल्या नऊ गर्लफ्रेंड कोण होत्या ते पाहू...
मिली सायरस 2006 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी मिली आणि निक दोघं एका कार्यक्रमात भेटले. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि कालांतराने प्रेमात झाले. पण 2007 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. मिलीने 2009 मध्ये दिलेल्या मुलाखतीत निकबद्दल बोलताना, तो प्रिन्स चार्मिंग असल्याचे म्हटले.
सेलेना गोमेझ- सायरससोबतच्या ब्रेकअपनंतर 2008 मध्ये निक सेलेना गोमेझला डेट करत होता. पण मिलीसारखेच 2009 मध्ये हे नातेही संपुष्टात आले.
डेल्टा गूडरेम- जोनस आणि ऑस्ट्रेलियन गायिका डेल्टा गूडरेम यांचे नाते जवळपास 10 महिने चालले. पण 2012 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. 2017 मध्ये दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यात आले. मात्र त्यांच्यात पहिल्यासारखे काही नव्हते. डेल्टा निकपेक्षा आठ वर्षांनी मोठी होती.
ऑलिविआ कल्पो- निकच्या रिलेशनशिपमध्ये सर्वाधिक काळासाठी टिकलेलं नातं हे ऑलिविआसोबत होतं. 2013 मध्ये निक आणि ऑलिविआ एकमेकांना डेट करत होते. ऑलिविआ ही माजी मिस युनिवर्स आहे. मात्र २ वर्षांच्या डेटिंग नंतर जून 2015 मध्ये दोघांचे मार्ग वेगळे झाले.
केंडेल जेनर- ऑगस्ट 2015 मध्ये केंडेल आणि निक एकमेकांसोबत अनेकदा फिरताना दिसले. पण दोघांनीही त्यांचे नाते प्रसारमाध्यमांसमोर कधीच मान्य केले नाही.
केट हुडसन- जोनस आणि गोल्डन ग्लोब विजेती केट यांनी सप्टेंबर 2015 मध्ये डेटिंग सुरू केले. केट निकपेक्षा 14 वर्षांनी मोठी होती. निकचे केटवर मनापासून प्रेम होते. आतापर्यंतच्या त्याच्या नात्यांपैकी केटसोबतच्या नात्याबद्दल निक गंभीर होता. मात्र हे नातेही इतर नात्यांप्रमाणे फारसे टिकले नाही.
लिली कोलीन्स- फेब्रुवारी 2016 मध्ये निक जोनस- लिली कोलीन्स डेट करत होते. पण अगदी काही महिन्यात हे नातेही संपुष्टात आले.
जॉर्जिया फॉलर- निक आणि जॉर्जिया या दोघांना पहिल्यांदा 2017 मध्ये जो निकस आणि सोफी टर्नर यांच्या साखरपुड्यात पाहण्यात आले. दोघंही नात्याबद्दल फारसे गंभीर नव्हते.
अखेर प्रियांका चोप्रा त्याला ती भेटली. काही महिन्यांच्या डेटिंगनंतर निक आणि प्रियांकाने साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आणि यथावकाश लग्नाच्या बेडीतही अडकले.